कंगनाचे ट्विट ; माझ्या एवढी प्रतिभावान अभिनेत्री संपूर्ण पृथ्वीवर शोधून दाखवा


आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत चर्चेत असते. कंगना आपले मत सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत असते. ती सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनेकदा वादातही अडकली आहे. दरम्यान कंगनाने आता एक नवे वक्तव्य केले असून आपल्यासारखी प्रतिभावान अभिनेत्री संपूर्ण जगात कोणीच नसल्याचे तिने म्हटले आहे.


याबाबत ट्विट करत कंगना म्हणाली आहे की, माझ्यासारखी वेगवेगळी भूमिका साकारण्याची प्रतिभा या संपूर्ण जगात कोणामध्ये असेल तर माझा अहंकार मी सोडून देईन. पण मी तोपर्यंत नक्कीच अहंकारात राहू शकते. याआधी एक ट्विट करत कंगनाने आपली तुलना हॉलिवूड अभिनेत्री गॅल गॅडोटशी केली होती. त्या ट्विटवरून कंगना प्रचंड ट्रोल झाली होती.