पीएम किसान सन्मान निधीअंतर्गत मिळणारे 6000 हवे असतील तर सर्वात आधी ‘हे’ काम करा


नवी दिल्ली: पंतप्रधान किसान सन्मान निधीचा फायदा घेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी असून केंद्र सरकारने पंतप्रधान किसान निधीच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. ज्या शेतकर्‍यांच्या नावावर शेती आहे, त्यांनाच आता फक्त 6 हजार रुपये दिले जाणार आहेत. आतापर्यंत या योजनेंतर्गत अनेक प्रकारच्या चुका समोर आल्या आहेत, ज्यावरून सरकारने सरसकट निधीचा लाभ देणं थांबविण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता आपल्याला नावावर शेतजमीन करून घ्यावी लागणार आहे. अद्यापही असे बरेच शेतकरी आहेत, ज्यांनी त्यांच्या नावावर शेतजमीन केलेली नाही. योजनेशी संबंधित जुन्या लाभार्थ्यांवरया नवीन नियमाचा परिणाम होणार नसल्याचे सरकारने म्हटले आहे. म्हणजेच हा नियम नवीन नियम नोंदणी करणाऱ्यांना लागू होईल.

आतापासून अर्जांच्या जागेचा भूखंड क्रमांक नवीन नोंदणी घेत असलेल्या अर्जदारांना द्यावा लागेल. ज्या लोकांचे संयुक्त कुटुंब आहे, त्यांना त्यांच्या मालकीची जमीन त्यांच्या नावावर करून घ्यावी लागेल. तरच या योजनेचा लाभ ते घेऊ शकतात. जर शेतकर्‍यांनी जमीन विकत घेतली असेल, तर त्यात कोणतीही अडचण येणार नाही.

एखादा शेतकरी जर शेती करतो, पण शेतात त्याच्या नावावर आणि वडिलांच्या किंवा आजोबांच्या नावावर जमीन नसेल तर त्याला वर्षाकाठीस 6000 रुपयांचा लाभ मिळणार नाही. शेतकऱ्याच्या नावे जमीन असावी लागेल. एखादा शेतकरी दुसर्‍या शेतकर्‍याकडून भाड्याने जमीन घेतल्यास त्यालाही योजनेचा लाभ मिळणार नाही. पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांच्या नावावर जमिनीची मालकी असणे आवश्यक आहे. शेतकरी किंवा कुटुंबातील कोणी घटनात्मक पदावर जर असेल तर त्याला त्याचा लाभ मिळणार नाही. याचा लाभ 10000 रुपयांपेक्षा जास्त मासिक पेन्शन असणाऱ्या सेवानिवृत्त निवृत्तीवेतनधारकांना मिळणार नाही.