‘या’ अनिवासी भारतीय मुलीसोबत लग्न करणार प्रभास ?


बाहुबली या चित्रपटानंतर अभिनेता प्रभासच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली असून त्याची तरुणींमध्ये विशेष क्रेझ आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये कायमच त्याच्या लग्नाची चर्चा रंगत असते. त्याचे नाव अनेकदा अभिनेत्री अनुष्का शेट्टीसोबतदेखील जोडले गेले. पण अनुष्कासोबत नव्हे तर एका एनआरआय मुलीसोबत प्रभास लग्न करणार असल्याचे ‘बॉलिवूड लाईफ’ने आपल्या वृत्तात नमूद केले आहे.

प्रभास-अनुष्काच्या अफेअरची चर्चा ‘बाहुबली’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि रंगू लागली. त्यांच्या चाहत्यांची या दोघांनी लग्न करावे अशी प्रचंड इच्छा आहे. पण अनुष्कासोबत नाही तर एका एनआरआय मुलीसोबत प्रभास लग्न करणार आहे. विशेष म्हणजे प्रभासचे लव्ह मॅरेज नसून अरेंज मॅरेज असल्याचे सांगितले जात आहे. प्रभासची होणारी पत्नी अमेरिकत वास्तव्यास असून तिचे वडील एका सॉफ्टवेअर कंपनीचे मालक आहेत. प्रभास आणि या मुलीच्या कुटुंबीयांनी चर्चा करुन हे लग्न ठरवले आहे. तसेच या लग्नाला प्रभासने देखील होकार दिला आहे.

दरम्यान, सध्या आपल्या ‘राधेश्याम’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये प्रभास व्यस्त आहे. या चित्रपटात पूजा हेगडे त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. १४ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्याच्यानंतर प्रभासच्या लग्नाचा बार उडणार आहे. पण या वृत्ताला अद्याप प्रभास किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून दुजोरा मिळालेला नाही.