अशा प्रकारे वापरु शकता ‘BookMyShow’ची नवी व्हिडिओ ऑन डिमांड सुविधा


मुव्ही तिकिटांची ऑनलाईन बुकिंग सेवा पुरवणाऱ्या ‘बुक माय शो’ ने प्रेक्षकांसाठी एक नवी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. आता बुक माय शोवर बुक माय शो स्ट्रीम ही सुविधा प्रेक्षकांसाठी उपलब्ध झाली आहे. या सुविधेला ट्रान्जेक्शनल व्हिडिओ ऑन डिमांड (TVOD) नाव देण्यात आले आहे. आता बुक माय शोच्या अॅपवर युजर्स ऑन-डिमांड मुव्हिज पाहू शकतात. युजर्सला या सर्व्हिसमध्ये चित्रपट खरेदी आणि भाड्याने घेण्याचा पर्याय असेल. प्रत्येक चित्रपटाचा खरेदी आणि भाडे दर वेगवेगळा असेल.

जे लोक कोरोनामुळे चित्रपटगृहात जाण्याचे टाळत आहेत त्यांच्यासाठी ही सुविधा लाभदायी ठरणार आहे. सुरुवातीलाच या सर्व्हिसमध्ये 72 हजार तासांहून अधिक कंटेन्ट आणि 600 हून अधिक चित्रपट उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त दर शुक्रवारी युजर्ससाठी प्रीमियम कंटेन्ट देण्यात येईल. बुक माय शोचे स्ट्रिम सबस्क्रिप्शन्स बेस्ड मॉडेल नेटफ्लिक्स आणि प्राईम व्हिडिओ सारख्या प्लॅटफॉर्महून खूपच वेगळे आहे. युजर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध कंटेन्ट ऑनलाईनच भाड्याने किंवा खरेदी करु शकतो.

नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राईम व्हिडिओ प्रमाणे बुक माय शोवर अनेक भाषांमध्ये चित्रपट उपलब्ध आहेत. सध्या ‘बुक माय शो स्ट्रीम’वर उपलब्ध चित्रपटांच्या यादीत क्रिस्टोफर नोलनचा ‘टेनट’ या वार्नर ब्रदर्सचा ‘वंडर वुमन 1984’, द गिल्टी, पोर्ट्रेट ऑफ ए लेडी ऑन फायर, आंखों देखी, आराधना (1969) आदी ब्लॉकबस्टर चित्रपटांचा समावेश आहे.

अशा प्रकारे वापरु शकता बुक माय शोची व्हिडिओ ऑन डिमांड सुविधा

  • bookmyshow चे अॅप डाऊनलोड तुम्हाला करावे लागले किंवा bookmyshow ची वेबसाईट ब्राऊझरमध्ये ओपन करा.
  • तुम्हाला आता रजिस्ट्रेशन करावे लागेल. तुम्ही यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक किंवा जीमेल, फेसबुकच्या मदतीने साईन इन करु शकता.
  • मुव्ही कॅटेगरीमध्ये जाऊन जो चित्रपट तुम्हाला पाहायचा आहे त्याच्यावर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर तुम्हा बाय किंवा रेंटचा पर्याय निवडावा लागेल.
  • आता कोणताही एक पर्याय निवडा आणि पुढे जा.
  • तुमचा फोन नंबर आणि ई-मेलची डिटेल विचारली जाईल.
  • यानंतर तुम्हाला पेमेंट ऑप्शन दिसेल.
  • पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुम्ही बुक माय शोवर सिलेक्ट केलेला चित्रपट पाहू शकता.