अखेर भारतात लाँच झाली बहुप्रतीक्षित MG Motorsची ZS EV 2021 फेसलिफ्ट


मुंबई : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढत चालला असल्यामुळे अनेक दिग्गज कार कंपन्या 2021 मध्ये इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वी लोक इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स कंपन्या लाँच करत आहेत. तसेच देशात काही इलेक्ट्रिक कार्स यापूर्वीदेखील लाँच झाल्या आहेत. दरम्यान, प्रसिद्ध कार निर्माती कंपनी MG Motors ने आपली नवी इलेक्ट्रिक एसयूव्ही भारतात लाँच केली आहे.

आपली बहुप्रतीक्षित MG ZS EV 2021 फेसलिफ्ट 2021 ही कार MG Motors ने सोमवारी अधिकृतपणे भारतात लाँच केली आहे. 20.99 लाख (एक्स शोरूम) रुपये या गाडीची सुरुवातीची किंमत असणार आहे. पूर्णपणे बॅटरीवर चालणारी ही कार कंपनीने 2020 च्या जानेवारीमध्ये लाँच केली होती. परंतु कंपनीने आता याच कारचे लेटेस्ट व्हर्जन लाँच केले आहे. ही कार जुन्या कारच्या तुलनेत अपग्रेड करण्यात आली आहे. 44.5 kWh क्षमतेची हायटेक बॅटरी या कारमध्ये देण्यात आली आहे, जी 400 किमीपर्यंतची रेंज देते.

कंपनीने म्हटले आहे की, प्रत्येक ऋतूमध्ये, वेगवेगळ्या तापमानांमध्ये ही बॅटरी तपासून पाहिली आहे. कंपनीला विश्वास आहे की, 300 ते 400 किमीपर्यंतची रेंज ही कार देऊ शकते. परंतु ही गोष्ट तुम्ही ती कार कुठे आणि कशी चालवता? यावर अवलंबून आहे. या बॅटरीसह ही कार 8.5 सेकंदांमध्ये 100 किमी प्रति तास एवढा वेग पकडू शकते आणि 143 PS देते.

दोन वेरिएंट्समध्ये ZS EV ही कार सादर केली जाणार आहे. एक्साइट आणि एक्सक्लूसिव्ह अशी या वेरिएंट्सची नावे आहेत. या कारच्या फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये 8 इंचांची इन्फोटेन्मेंट स्क्रीन, 6 एयरबॅग्स आणि फ्रंट ग्रिलवर ग्लो लोगो असे नेहमीचे फीचर्स देण्यात आले आहेत. सोबतच एक्सक्लूसिव्ह वेरिएंटमध्ये डुअल-पॅन पॅनोरमिक सनरूफ, लेदर सीट, पॉवर फोल्डेबल ORVM, रेन सेन्सिंग वायपर्स, सिक्स वे पॉवर अॅडजस्टेबल ड्रायवर सीट आणि i-स्मार्ट ईव्ही 2.0 कनेक्टेड कार फीचर्स दिले आहेत. 24.18 लाख रुपये एवढी एक्सक्लूसिव्ह वेरिएंटची किंमत आहे.

एमजी कंपनीचे म्हणणे आहे की, चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चर एक्सपँड करणे त्यांनी सुरु ठेवले आहे. तसेच प्रत्येक ZS EV युनिटसह ग्राहकांना वॉल चार्जिंग युनिट दिले जाणार आहे. या बॅटरी पॅकवर कंपनी 8 वर्षांची वॉरंटी देत आहे. सोबतच कंपनीने 5 वर्षांची अनलिमिटेड किलोमीटर वॉरंटी किंवा 1.50 लाख किलोमीटरची ऑफर दिली आहे. कंपनीने यासह पाच मोफत लेबर सर्विस, 5 रोड साइड असिस्टन्स आणि 5 वें चार्जिंगची सुविधा दिली आहे. कंपनी भारतातील 31 शहरांमध्ये त्यांच्या EV वाढवण्याची तयारी करत आहे.

दोन ट्रिम्स ऑप्शनमध्ये ही कार उपलब्ध आहे. Excite आणि Exclusive चा ज्यामध्ये समावेश आहे. 44.5 kWh ची लिक्विड कूल्ड लिथियम आयन बॅटरी MG ZS EV मध्ये देण्यात आली आहे, 150 PS पॉवर आणि 353 Nm टॉर्क जी जनरेट करते. SUV एकदा चार्ज केल्यानंतर 340 किमीपर्यंत अंतर धावू शकते. MG ने म्हटले आहे की, ZS EV मधील बॅटरी 15A होम सॉकेट आणि DC फास्ट चार्जरनेसुद्धा चार्ज करु शकता. 50 kW DC फास्ट चार्जरद्वारे ही बॅटरी चार्ज केली तर 80 टक्के बॅटरी चार्ज होण्यासाठी केवळ 50 मिनिटे पुरेशी आहेत. सुरक्षेसाठी या गाडीत 6 एअरबॅग्स, HDC, HSA, ABS आणि EBD सारखे स्टँडर्ड फिचर्स देण्यात आले आहेत. या कारची सुरुवातीची किंमत 20 लाख रुपये एवढी आहे.