रेमोला सावळ्या रंगावरुन अनेकांनी केले ट्रोल ; शेअर केला अनुभव


सिनेसृष्टीतील वर्णभेद हा मुद्दा आपल्या सर्वांसाठी काही नवीन नाही. उत्तम अभिनय येत असताना सुद्धा केवळ वर्णभेदामुळे अनेक कलाकारांना डावलण्यात आले आहे. अनेक कलाकार याविषयी व्यक्तदेखील झाले आहेत. आता प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझाने यामध्येच त्याच्या अनुभवांचे कथन केले आहे. केवळ सिनेसृष्टीच नाही, तर अगदी लहानपणापासून त्याला वर्णद्वेषाचा त्रास सहन करावा लागल्याचे त्याने अलिकडेच एका मुलाखती दरम्यान सांगितले आहे.

मला अगदी लहान असल्यापासून वर्णद्वेषाचा त्रास सहन करावा लागला आहे. मला लोक माझ्या रंगावरुन कायम चिडवायचे, माझ्या रंगावर भाष्य करायचे. पण, त्यांच्याकडे मी कधीच लक्ष दिले नाही. फक्त माझ्या कामावर मी लक्ष केंद्रित करत होतो. पण, आजही आपल्या देशात वर्णद्वेष केला जातो हे सत्य असल्याचेही रेमो म्हणाला.

रेमो डिसूझाप्रमाणेच वर्णभेदाचा सामना अभिनेत्री प्रियांका चोप्रा, मलायका अरोरा, सोनम कपूर, हर्षदा खानविलकर यांसारख्या अनेक कलाकारांना करावा लागला आहे. विशेष म्हणजे या वर्णभेदावर आधारित अनेक मालिका, चित्रपटांचीदेखील निर्मिती करण्यात आली आहे.