नवी दिल्ली – आज पुन्हा एकदा केंद्रीय अर्थसंकल्पावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. शेतकरी व जवानांच्या हिताचा हा अर्थसंकल्प नसून, हा अर्थसंकल्प केवळ उद्योजकांच्या फायद्याचा असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधींनी अर्थसंकल्पात सैनिकांच्या पेंशन कपातीच्या मुद्य्यावरून ट्विटद्वारे केंद्र सरकारवर टीका केली आहे.
मोदी सरकारसाठी ना जवाव, ना शेतकरी…. उद्योजक मित्रच देव
बजट में सैनिकों की पेंशन में कटौती।
ना जवान ना किसान
मोदी सरकार के लिए
3-4 उद्योगपति मित्र ही भगवान!— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 8, 2021
सैनिकांच्या पेंशनमध्ये अर्थसंकल्पात कपात. ना जवान, ना शेतकरी… मोदी सरकारसाठी तीन-चार उद्योजक मित्रच देव असल्याचे ट्विट करत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, आपला भूभाग चीनने बळकावला आहे. पंतप्रधान मोदी पीआर फोटोसाठी म्हणून जवानांसोबत दिवाळी साजरी करतात. मग त्यांनी सैनिकांसाठी संरक्षणाचे बजेट का वाढवले नाही? असा सवाल या अगोदर राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे मोदी सरकारला विचारलेला आहे.
घरगुती एलपीजी सिलेंडर आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत केंद्रीय बजेटच्या महागाईमुळे वाढ झाली आहे. देशाचे आणि घराचे दोन्हींचे बजेट मोदी सरकारने बिघडवले असल्याचे देखील राहुल गांधी केंद्रीय अर्थसंकल्पावरून केंद्र सरकारवर टीका करताना या अगोदर म्हणाले आहेत.