राष्ट्रपतींचे म्हणणे सर्वांनी ऐकले असते, तर लोकशाहीची प्रतिष्ठा आणखी वाढली असती – पंतप्रधान


नवी दिल्ली – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत आभार व्यक्त केले. मोदी यावेळी म्हणाले की, आदरणीय सभापती महोदय, आव्हानांना संपूर्ण जग सामोरे जात आहे. अशा आव्हानांना सामोरे जावे लागेल, असा विचारदेखील कुणी केला नसेल. या दशकाच्या सुरूवातीस, संयुक्त सभागृहात जे भाषण राष्ट्रपतींनी केले, ते नवीन आत्मविश्वास निर्माण करणारे आहे. हे भाषण म्हणजे आत्मनिर्भर भारताचा मार्ग दाखवणारे आणि या दशकासाठी मार्ग प्रशस्त करणे.

पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, सुमारे 13-14 तास राज्यसभेत खासदारांनी त्यांचे मौल्यवान मत मांडले आणि अनेक बाबींवर प्रकाश टाकला. त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. पण, राष्ट्रपतींचे भाषण सर्वांनी ऐकले असते तर लोकशाहीची प्रतिष्ठा आणखी वाढली असती. राष्ट्रपतींच्या भाषणाची ताकद एवढी होती, बरेच लोक ऐकत नसतानाही बोलू शकले. त्यातून, भाषणाचे मूल्यांकन केले जाऊ शकते.

पुढे मोदी म्हणाले की, स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात आपण पदार्पण करत आहोत. काहीतरी नवीन या काळात केले पाहिजे. येणाऱ्या काळात स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षी आपण कुठे असावे, याबाबत आपल्याला आताच विचार करायला हवा. संपूर्ण जगाचे लक्ष्य़ आज आपल्यावर आहे. मी येणाऱ्या संधीबद्दलजेव्हा बोलत आहे, तेव्हा मला मैथिलीशरण गुप्त यांची कविता आठवते. ते म्हणतात, अवसर तेरे लिए खड़ा है, फिर भी तू चुपचाप पड़ा है। तेरा कर्मक्षेत्र बड़ा है, पल-पल है अनमोल, अरे भारत उठ, आंखें खोल।

ते म्हणाले की कोणालाही कोरोनादरम्यान मदत करणे कठीण होते. एक देश दुसर्‍या देशाला, एक राज्य दुसर्‍या राज्याला, एका कुटुंब दुसर्‍या कुटुंबाला मदत करू शकत नव्हते. कोट्यावधी लोक मरणार, असे म्हटले जात होते. एक अनोळखी शत्रू काय करू शकतो, याची कल्पनाही कुणाला नव्हती. याचा सामना कसा करावा, हेदेखील आपल्याला माहित नव्हते. आपल्याला मार्ग शोधायचे होते आणि लोकांचे प्राण वाचवायचे होते. जी बुद्धी आपल्याला देवाने दिली, त्याच्या मदतीने लोकांना वाचवण्यात यश आले. लोक याची दाद देत आहेत.

पुढे मोदी म्हणाले की, तुम्ही सोशल मीडियामध्ये पाहिले असेल, फुटपाथवर बसलेली वृद्ध आई दिवा लावत होती. काही जम त्याची थट्टा करत होते. जे कधीच शाळेत गेले नाहीत, त्यांनी देशातील सामूहिक शक्तीची ओळख जगाला करुन दिली. परंतु काही जणांनी त्या सर्वांची चेष्टा केली. विरोध करण्यासाठी अनेक मुद्दे असतात. पण, तुम्ही देशाला तोडणाऱ्या गोष्टींमध्ये अडकू नका. आमचे कोरोना वॉरियर्स, ज्यांनी कठीण काळात जबाबदारी घेतली, त्यांचा आदर केला पाहिजे. असे देशाने दाखवून दिले.

पुढे मोदी म्हणाले की, जगात ज्या देशाचा तिसरा नंबर लागतो, त्या देशाने सर्वात आधी व्हॅक्सिन आणल्यामुळे जगभरात कौतुक झाले. आपल्या देशात जगातील सर्वात मोठे लसीकरण सुरू आहे. आज कोरोनाने जगासोबत आपल्या नात्याला नवीन ओळख दिली. 150 पेक्षा जास्त देशात भारताने कोरोना व्हॅक्सिन पाठवली. कोरोनासारख्या कठीण काळात देश आणि राज्याने कसे काम करावे, हे देशाने दाखवून दिले. मी सर्वांचे आभार मानतो.

यावेळी बंगालचादेखील मोदींनी उल्लेख केला. ते म्हणाले की, 181 गणतंत्रांचे वर्णन प्राचीन भारतात आहे. भारताचा राष्ट्रवाद संकुचित, स्वार्थी किंवा आक्रमक नाही. हा सत्यम, शिवम, सुंदरमवरुन प्रेरित आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे हे शब्द आहेत. आपण कळत-न कळत नेताजींच्या भावना, त्यांचे विचार, आदर्शांना विसरलो आहोत. आपण आपल्या तरुण पिढीला सांगितलेच नाही की, या देशात लोकशाहीचा उदय झाला. ही बाब आपल्याला गर्वाने सांगावी लागेल. भारताच्या शासन व्यवस्थेमुळे आपण लोकशाहीचे पालन करत नाही, मुळात येथे लोकशाही होती, म्हणूनच आपण अशी व्यवस्ता आहे. इमरजंसीच्या वेळेस प्रत्येक संस्था तुरुंगात होती, पण लोकशाही काम राहिली.

रविवारी सर्व खासदारांना सभागृहात हजर राहण्यासाठी काँग्रेसने व्हिप जारी केला. शुक्रवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर आभार मानण्यासाठी राज्यसभेत 25 पक्षातील 50 नेत्यांनी भाग घेतला होता. यात भाजपचे 18, काँग्रेसचे 7 आणि इतर पक्षांचे 25 खासदार सामील झाले. या सर्वांसाठी 15 तासांचा वेळ देण्यात आला होता. सुरुवातीला विरोधी पक्षांना नवीन कृषी कायद्यांवर स्वतंत्रपणे वादविवाद हवे होते, परंतु नंतर त्यांनी आभार प्रस्तावावरील चर्चेत याला समाविष्ट करण्याचे मान्य केले.

बजेट सत्राच्या कारवाईदरम्यान आतापर्यंत गोंधळच झाला. सतत सत्ताधाऱ्यांना कृषी कायद्यावरुन विरोधक घेरण्याचा प्रयत्न करत होते. एक वेळ तर अशी आली की, उपराष्ट्रपती आणि सभापती व्यंकय्या नायडू यांना विरोधकांना म्हणावे लागले, चुकीचे उदाहरण देऊ नका. लोकांची दिशाभूल करू नका आणि कृषी कायद्यावर चर्चा झालीच नाही, असे म्हणू नका. मतदान झाले होते आणि सर्व पक्षांनी आपली बाजू मांडली होती.