पुणे : पुढच्या निवडणुकीत भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना घरी बसवले नाही, तर मी माझ्या बापाची अवलाद नाही, अशी सणसणीत टीका कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी केल्यामुळे आता रावसाहेब दानवे विरुद्ध हर्षवर्धन जाधव हा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
पुढच्या निवडणुकीत दानवेंना घरी बसवले नाही, तर मी माझ्या बापाची अवलाद नाही – हर्षवर्धन जाधव
राजकीय दबावाने रावसाहेब दानवे यांनी गुन्हे दाखल केल्याचा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला होता. त्यानंतर आता उच्च न्यायालयाने त्यांना दिलेल्या जामिनात राजकीय दबावाने गुन्हे दाखल झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे यात राज्य सरकारने तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही लक्ष घालावे, अशी मागणी हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे. रावसाहेब दानवेंना पुढच्या निवडणुकीत घरी नाही बसवले, तर की माझ्या बापाची अवलाद नाही. रावसाहेब दानवे यांचा हा दबाव मोडून काढा आणि मला सरंक्षण द्यावे, असेही हर्षवर्धन जाधव म्हणाले.