स्वादासोबतच आरोग्याचा देखील खजिना-पाणीपुरी

panipuri
पाणीपुरीचे नाव काढता क्षणी आपल्या सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते. चमचमीत, आंबट गोड पाणीपुरी आवडत नाही असा मनुष्य विरळाच. पाणीपुरी हा केवळ स्वदाचाच नाही, तर आरोग्याचा देखील खजिना आहे. पण अनेकदा पाणी पुरी खाल्ल्याने पोट बिघडणे, उलट्या, जुलाब होणे, अश्या तक्रारीही ऐकू येत असतात. पण या तक्रारी पाणी पुरीमुळे नसून, त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या खराब प्रतीमुळे आणि निम्न दर्जाची उत्पादने वापरल्यामुळे, तसेच अस्वच्छतेमुळे उद्भवित असतात. त्यामुळे पाणीपुरी घरच्याघरी बनविली गेली तर या समस्या उद्भविण्याची शक्यता ही कमी होते.
panipuri1
पाणी पुरीच्या पाण्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या जिरे, काळे मीठ, आणि काळ्या मिरीची पूड इत्यादी मसाल्याच्या पदार्थांचे मिश्रण केवळ चविष्टच नाही, तर पाचनतंत्र सुधारणारे आहे. यांचे सेवन केल्याने पित्त शमते. तसेच तोंड आल्यासही हे पाणी अतिशय उपयुक्त असते. पाणी पुरीच्या पाण्यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर असल्याने त्याने देखील पचनतंत्र चांगले राहते, व गॅसेसचा त्रास दूर होतो. तसेच या पाण्याच्या सेवनामुळे बद्धकोष्ठही दूर होते. पाणी पुरीच्या पुरी बनविण्यासाठी गव्हाच्या पिठाचा वापर करावा. या पुऱ्यांमध्ये पाणी पुरीचे पाणी भरून खाल्ल्यास पित्ताने होणारी मळमळ थांबते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment