पाश्चिमात्य जगताला कोरियन मेकअपची भुरळ

kbeauty
हजारो वर्षे मेकअपचा वापर सौंदर्य वाढविण्यासाठी केला जात आहे आणि फॅशनच्या दुनियेत तर मेकअपला फारच महत्व आहे. अर्थात हि दुनियाच रंगरंगीली असल्याने दररोज त्यात नवीन काहीतरी बदल होत असतात. पाश्चिमात्य जगात आता कोरियन मेकअपची क्रेझ प्रचंड वाढली असून कोरियन सौंदर्यउद्योगाची त्यामुळे वेगाने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

के ब्युटी हा नवा ट्रेंड परदेशात चांगलाच रुळला आहे यामागे सौंदर्यतज्ञ असे कारण सांगतात कि कोरियन सौंदर्य उद्योग जगाच्या किमान १० ते १२ वर्षे पुढे आहे. यात स्वच्छ नितळ त्वचेला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे पाश्चात्य मेकअप प्रमाणे चेहऱ्यावरचे डाग लपविण्यासाठी भरमसाठ फौंडेशन थापण्याची गरज राहत नाही. लहानपणापासूनच कोरियन लोकांना त्वचा नितळ असण्याचे महत्व पटविले जाते.

makeup1
मेकअप करताना प्रामुख्याने क्लिन्झर, टोनर आणि मोईस्चरायझर अश्या स्टेप फोलो केल्या जातात. कोरियन मेकअप मध्ये ७ ते १२ स्टेप येतात. त्यात नैसर्गिक वस्तूंचा वापर अधिक असतो. शिवाय कोरियन संशोधक नवनवीन सौंदर्यवर्धक पदार्थ शोधण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयोग करत असतात. मधमाशांचे मेण, गोगलगाईच्या शरीरातील प्रोटीन असले पदार्थ वापरले जातात. या प्रोडक्ट्सचे पॅकिंग अतिशय आकर्षक असते.

makeup
विशेष म्हणजे कोरियात महिलांप्रमाणे पुरुषांमध्ये मेकअप करण्याचे प्रमाण खूप मोठे आहे त्यामुळे पुरुष वर्गासाठीहि अनेक सौंदर्य प्रसाधने उपलब्ध होतात. त्यामुळे या मेकअपची क्रेझ वाढत चालली आहे.
—————–

Leave a Comment