५० मिनिटात ७०० कॅलरी जाळणारा मसाला भांगडा

masala
पंजाबी लोकनृत्य भांगडा जगभरात उत्साह देणारा नृत्यप्रकार म्हणून ओळखला जातो. याच उल्हासित करण्याऱ्या भांगड्याचे नवे रूप वजन घटवू इच्छिणाऱ्यासाठी वरदान ठरते आहे. मसाला भांगडा नावाने केला जात असलेला हा नृत्यप्रकार कोणत्याची वयोगटासाठी उपयुक्त ठरत असून त्यातून नृत्य आणि व्यायाम अश्या दोन्ही गोष्टी साधता येत आहेत. या व्यायाम प्रकारामुळे शरीरातील चरबी घटणे, विषद्रव्ये शरीराबाहेर पडणे आणि शरीर आकारात येणे असे फायदे होताना दिसून येत आहेत. या व्यायामाने ५० मिनिटात ७०० कॅलरी जाळल्या जातात आणि रोज १० मिनिटाचा व्यायाम पुरेसा होतो. त्यामुळे कमी वेळात अधिक कॅलरी जाळणारा हा नृत्यप्रकार लोकप्रिय होत आहे.

या नृत्यामुळे मनावरचा ताण कमी होतो आणि शरीरातील हार्मोन अॅक्टीव्ह झाल्याने त्याचा दीर्घ काळासाठी फायदा होतो असे सांगितले जात आहे. या नृत्यात पूर्ण शरीराचे वर्कआउट होतेच पण झुम्बा या नृत्यप्रकारप्रमाणे यात कार्डीओ व्यायाम होतो. या नाचाच्या स्टेप सोप्या आहेत तसेच त्यामुळे खांदे, पाया, कंबर यांना चांगला व्यायाम मिळून पाठीचे, कमरेचे, खांद्याचे, पोटऱ्यांचे स्नायू अधिक सक्षम बनतात. सैल कपडे घालून हा व्यायाम केला जातो असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment