बेदाण्याचे सेवन देईल आरोग्यपूर्ण जीवन

raisins
आपला चेहरा तजेलदार चमकता असावा अशी अनेकांची मनीषा असते आणि त्यासाठी अनेक रासायनिक क्रीम, लोशनचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. कधी कधी या क्रीमचे साईड इफेक्ट वापरणाऱ्याना चांगलेच महागात पडतात असेही दिसून येते. चेहरा तजेलदार करण्याचे आणि चेहरयाची कांती चमकदार बनविण्याचे काम आपल्या रोजच्या वापरातील एक पदार्थ उत्तमप्रकारे करतो आणि तो आहे सुकामेव्यात सामील होणारा बेदाणा.

द्राक्षे वळवून त्यापासून बेदाणा बनविला जातो. हा बेदाणा आरोग्य प्राप्तीसाठी अतिशय उपयुक्त आहे. या बेदाण्यात द्रक्षातील सर्व गुण आहेत. बेदाणे रोजच्या खाण्यात असतील तर रस, रक्त, शुक्र या धातूंचे पोषण चांगले होते आणि आरोग्यप्राप्ती होते. बेदाण्यात लोह, पोटॅशियम, कॅलशियम, मॅग्नेशियम, आणि चोथा चागल्या प्रमाणात असतो यामुळे पचनक्रिया सुधारते.

bedane
रिकाम्या पोटी रात्री भिजत घातलेले बेदाण्याचे पाणी प्यायल्याने अनेक फायदे मिळतात. यामुळे बद्धकोष्ठता कमी होते, रक्तातील कॉलेस्टरोलची पातळी नियंत्रणात येते, ट्रायग्लीसंरॉईडची पातळी घटते. ताप येत असल्यास तो उतरतो. सेक्स पॉवर वाढते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात, लिव्हरचे आरोग्य सुधारते, चयापचय क्रिया सुधारते आणि रक्त शुद्ध होते.

Leave a Comment