आता तुमच्याही बागेत फुलतील निळे गुलाब

rose
गुलाबप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. गुलाबप्रेमी आता त्याच्या बागेत, घरातल्या कुंडीत निळे गुलाब फुलवू शकणार आहेत. निसर्गात गुलाबाचे अनेक रंग अस्तित्वात असले तरी निळा गुलाब नाही त्यामुळे तो अशक्यता, रहस्य याचे प्रतिक बनला आहे. मात्र चीनचा चायनीज अकादमी ऑफ सायन्स व झीयान्सीन विद्यापीठ येथील संशोधकानी असे निळे गुलाब फुलविण्याचे तंत्र शोधून काढण्यात यश मिळविले आहे. त्यासाठी अगदी सोपी प्रक्रिया केली गेल्याने सर्वसामान्य फुलप्रेमी हे गुलाब वाढवू शकणार आहेत.

blue-rose
मिळालेल्या माहितीनुसार २० वर्षापूर्वी निळा गुलाब फुलविण्यात यश आले होते मात्र या गुलाबाचा रंग फार काळ टिकत नव्हता आणि तो निळ्यापेक्षा फिकट जांभळा होता. नव्या तंत्राने फुलविलेले गुलाब मात्र गडद निळे आहेत. यासाठी संशोधकांनी पांढऱ्या गुलाब पाकळ्यात एका विशिष्ट जातीचे बॅक्टेरीया रोपण केले आणि त्यातून या गुलाबाना सुंदर निळा रंग मिळाला आहे. जगातील हा पहिला निळा गुलाब असल्याचा दावा केला जात आहे. यापुढे हे संशोधक निळा रंग येण्यासाठी उपयुक्त असलेला बॅक्टेरीया फुले स्वतःच तयार करू शकतील यासाठी संशोधन करणार आहेत. यामुळे कुणीही निळे गुलाब सहज फुलवू शकेल.

Leave a Comment