महाविकास आघाडीतील मंत्री मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या भूमिकेवर नाराज


मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील नाराजी नाट्य काही संपण्याचे नाव घेत नसून मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या भूमिकेवर आता महाविकास आघाडीतील काही मंत्र्यांची नाराजी असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इक्बाल चहल यांनी मुंबईसाठी नियोजन करणार्‍या विविध प्राधिकरणांऐवजी मुंबई महापालिकेला नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करावे, अशी भूमिका मांडली आहे. त्यांच्या या भूमिकेवर महाविकास आघाडीतील मंत्री आहे.

महापालिका आयुक्तांनी मुंबई महापालिकेचे बजेट सादर करताना मुंबईसाठी एका प्राधिकरणाच्या प्रस्ताव दिल्याचे नमूद केले. म्हाडा, SRA, MMRDA अशी विविध नियोजन प्राधिकरणे मुंबईत आहेत. या प्राधिकरणाची जबाबदारी देखील विविध पक्षात वाटून दिल्याचे असताना आयुक्तांनी महाविकास आघाडी सरकारला विचारात न घेता प्रस्ताव दिल्यामुळे महाविकास आघाडीतील मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. कोणताही धोरणात्मक निर्णय घेताना याबाबत तिन्ही पक्षांमध्य चर्चा अपेक्षित असते. पण तसे न होता थेट मुंबई अर्थसंकल्पात हा उल्लेख आल्याने काही मंत्र्यांनी यावर नाराज आहेत.