आधार कार्डात कोणतीही समस्या असल्यास ‘या’ नंबरवर साधा संपर्क


आता आधार क्रमांकाची गरज सरकारी कामांपासून ते खासगी कामांसाठी देखील पडू लागली आहे. पण, आधार कार्ड हरविणे, मोबाईल नंबर लिंक नसणे, पत्ता चुकीचा, नाव- जन्मतारीख चुकीची अशा अनेकांच्या समस्या असतात. पोस्ट ऑफिस आणि आधार केंद्रांवर यासाठी त्यांना हेलपाटे मारावे लागायचे. पण UIDAI ने आता टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक जारी करून मोठा सर्वसामन्यांचा त्रास वाचविला आहे.

आधार प्रणाली राबविणाऱ्या UIDAI ने हेल्‍पलाइन क्रमांक 1947 सुरु केला आहे. या क्रमांकावर 12 वेगवेगळ्या भाषांमधून संपर्क साधता येणार आहे. आधार कार्डशी संबंधित कोणत्याही समस्येचे उत्तर या नंबरवर फोन केल्यानंतर मिळू शकणार आहे. थोडक्यात युआयडीएआयने कस्टमर केअर सारखे कॉल सेंटर सुरु केले आहे. UIDAI ने अधिकृत ट्विटर अकाऊंटवर याची माहिती दिली आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलगु, कन्नड, तामिळ, मल्याळम, पंजाबी, गुजराती, उडिया, बंगाली, आसामी आणि उर्दू भाषांमध्ये या नंबरवर सेवा देण्यात येत आहे.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) ऑक्टोबर २०१९ मध्ये आधार कार्डचे नवे प्रिटींग सुरू केले आणि आधार पीव्हीसी कार्ड हे नवे कार्ड बाजारात आणले. बँकेच्या एटीएम किंवा डेबिट कार्डसारखा आधार पीव्हीसी कार्डचा आकार हा असल्यामुळे तुम्ही ते पाकिटात सहजपणे ठेवू शकता. विशेष म्हणजे तुम्ही घरबसल्या तुमच्या एकाच मोबाइल क्रमांकावरुन संपूर्ण कुटुंबासाठी पीव्हीसी आधारकार्ड ऑनलाइन ऑर्डर करू शकता. या पीव्हीसी आधारकार्डासाठी तुम्हाला फक्त ५० रुपये शुल्क द्यावे लागेल.