हिंदू देवी-देवतांविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या कॉमेडियन मुनव्वर फारुकीला जामीन मंजूर


नवी दिल्ली : कॉमेडियन मुनव्वर फारुकीला हिंदू देवी-देवतांविषयी अवमानकारक वक्तव्य करत धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मध्यप्रदेश सरकारला जामीन याचिकेवरुन एक नोटीस देखील जारी केली आहे. कॉमेडियन फारुकीवर आरोप आहे की, एका कार्यक्रमात त्याने धार्मिक भावना दुखावत चेष्टा केली होती. इंदौरच्या कॅफे मोनरोमध्ये एक जानेवारी रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

इंदौर पोलिसांनी दोन फेब्रुवारीला कॉमेडियन फारुकी आणि त्याच्या चार सहकाऱ्यांना अटक केली होती. याआधी मध्यप्रदेशच्या एका स्थानिक न्यायालयाने पाच जानेवारीला जामीन अर्ज फेटाळला होता. फारुकीच्या विरोधात भाजप महापौर मालिनी गौर यांचा मुलगा एकलव्य गौरने तक्रार केली होती. त्यांनी या तक्रारीत म्हटले होते की, नवीन वर्षानिमित्त इंदौरमध्ये आयोजित एका कॉमेडी शोदरम्यान फारुकीने हिंदू देव-देवतांबाबत आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या विरुद्ध वादग्रस्त वक्तव्य केले होते.