ट्विटरने अत्यंत जिव्हारी लागणारे कंगनाचे दोन ट्विटरस हटवले


अभिनेत्री कंगना राणावतचे दोन ट्विटस ट्विटरने हटवले आहेत. ट्विटरच्या नियमांचे कंगनाच्या या ट्विटसमुळे उल्लंघन होत असल्यामुळे हे ट्विटस हटवण्यात आले. कंगनाचा सध्या शेतकरी आंदोलनाचे समर्थन करणाऱ्या प्रत्येक सेलिब्रिटी बरोबर वाद सुरु आहे. कंगना ट्विटरवरुन अत्यंत जिव्हारी लागणाऱ्या शब्दांमध्ये टीका करत आहे.

देशातील वातावरण आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानाने शेतकरी आंदोलनाचे समर्थन करणारे ट्विटर केल्यापासून ढवळून निघाले आहे. रिहानासह देशातील सेलिब्रिटींवरही कंगनाने जोरदार टीका केली. तिचा गायक, अभिनेता दिलजीत दोसांझ बरोबरच वाद चांगला गाजला. तिने दिलजीतला खलिस्तानी म्हटले. तिने शेतकऱ्यांबद्दलही प्रक्षोभक टिप्पणी केल्यामुळे अनेक युझर्सनी ट्विटरकडे कंगनाच्या अकाऊंटची तक्रार केली व तिच्या ट्विटर अकाऊंटवर बंदी घालण्याची मागणी केली.

कंगनाचे ट्विटर अकाऊंट मागच्या महिन्यात काही तासांसाठी बंद करण्यात आले होते. सध्या सुरु असलेल्या वादात, कंगनाने जे ट्विटस केले होते, तिथे आता ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे हे ट्विटस आता उपलब्ध नाही असा मेसेज दाखवण्यात येत आहे.