ग्रेटा थनबर्गची दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केल्यानंतर प्रतिक्रिया


नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांनी पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग विरोधात एफआयआर दाखल केली आहे. ग्रेटा थनबर्गवर गुन्हेगारी कट रचणे आणि वैरभाव निर्माण करणे, असे आरोप करण्यात आले आहेत. ग्रेटा थनबर्ग विरोधात हा एफआयआर भारतातील शेतकरी आंदोलना संदर्भात केलेल्या ट्विटमुळे नोंदवण्यात आला आहे.

एफआयआर दिल्ली पोलिसांनी नोंदवल्यानंतर आता ग्रेटा थनबर्गने ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली होती. शेतकऱ्यांसोबत मी आहे. त्यांच्या शांतीपूर्ण आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. कुठलाही द्वेष, धमकी किंवा मानवी हक्काच्या उल्लंघनामुळे यात बदल होणार नसल्याचे ग्रेटा थनबर्गने म्हटले आहे. १५३ अ (धर्माच्या आधारावर वेगवेगळया गटांमध्ये वैरभाव निर्माण करणे) आणि कलम १२० ब (गुन्हेगारी कट रचणे) या कलमातंर्गत ग्रेटा थनबर्गवर आरोप ठेवण्यात आले आहेत.

मंगळवारी रात्री ग्रेटा थनबर्गने ट्विट केले होते. भारतातील शेतकरी आंदोलनाच्या पाठिशी भक्कमपणे उभे असल्याचे तिने म्हटले होते. तिने या आंदोलनासंदर्भातील सीएनएनचा लेखही शेअर केला होता. रिहानाच्या पाठोपाठ ग्रेट थनबर्गने केलेल्या टि्वटमुळे जगाचे लक्ष या आंदोलनाकडे वेधले गेले.