नवी दिल्ली – मागील दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर केंद्र सरकारच्या कृषि कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. पंजाबी सिंगर आणि अभिनेत्यांनीही याला पाठींबा दिला आहे. हॉलिवूड सिंगर, पॉप स्टार, अॅक्ट्रेस रिहाना हिने देखील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केल्यानंतर आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटीही या आंदोलनावर मत व्यक्त करताना दिसत आहेत. रिहानानंतर ग्रेटा थनबर्ग, पूर्वश्रमीची पॉर्नस्टार मिया खलिफा यांनी देखील शेतकरी आंदोलनाबद्दल ट्विट केले. ग्रेटाने केलेले ट्विट डिलीट केले होते. पण ग्रेटविरोधात आता पोलिसांनी FIR दाखल केली आहे.
स्वीडनची पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा धनबर्ग विरोधात दिल्ली पोलिसांकडून FIR
दिल्ली पोलिसांनी स्वीडनची रहिवाशी पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग हिच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी ही एफआयआर भडकाऊ ट्विट केल्या प्रकरणी दाखल केली आहे. लवकरच या प्रकरणी पोलीस पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.