दिल्लीच्या सीमेवर नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहे. आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना आणि पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गने या आंदोलनाचे समर्थन केले असून त्यांच्यानंतर आता पॉर्न स्टार मिया खलिफानेही शेतकरी आंदोलनाचे समर्थन केले आहे.
या पॉर्नस्टारकडून शेतकरी आंदोलनाचे समर्थन
“Paid actors,” huh? Quite the casting director, I hope they’re not overlooked during awards season. I stand with the farmers. #FarmersProtest pic.twitter.com/moONj03tN0
— Mia K. (Adri Stan Account) (@miakhalifa) February 3, 2021
आंदोलक शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मिया खलिफाने एक ट्विट केले असून आंदोलनात सहभागी झालेल्या ज्येष्ठ महिलांचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर करत मानवाधिकाराचे मोदी सरकारने उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. कोणत्या मानवाधिकाराचे उल्लंघन होत आहे? दिल्लीत त्यांनी इंटरनेट सेवा खंडीत केली?, असे ट्विट करत मिया खलिफाने शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या ज्येष्ठ महिलांचा फोटो पोस्ट केला आहे. तिने त्या फोटोंमधील पोस्टरवर शेतकऱ्यांची हत्या करणे बंद करा, असे लिहिले आहे.
याआधी शेतकरी आंदोलनाचा रिहानानेही व्हिडीओ ट्विट करत याकडे सगळ्याचे लक्ष वेधले आहे. शेतकरी आंदोलनाविषयी आपण बोलत का नाहीत?, असा सवाल तिने ट्विटद्वारे केला आहे. तर ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. ग्रेटाने ट्विट करत भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांना माजी भारतीय क्रिकेटर प्रज्ञान ओझासह अनेक व्यक्तींनी उत्तर दिले आहे. प्रज्ञान ओझाने लिहिले आहे की, शेतकऱ्यांबाबत आपला देश गर्व करतो आणि शेतकरी किती महत्वपूर्ण आहे याची जाणीव आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, त्यांच्या शंकांच लवकरच निरसन होईल. पण आम्हाला दुसऱ्यांच्या प्रश्नांत पाय घालणाऱ्यांची गरज नसून आमचा हा खासगी प्रश्न आहे.