नवी दिल्ली – दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही या आंदोलनाची दखल घेतली जात आहे. पॉप स्टार रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग हिच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे.
राहुल गांधींनी रिहानाला सुनावले, आमच्या देशातील अंतर्गत प्रश्नात तुमची ढवळाढवळ नको
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी रिहाना हिच्या ट्विटरवर म्हणाले आहेत की, हा आमच्या देशातील अंतर्गत प्रश्न असून त्यात ढवळाढवळ करु नका. तसेच केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे मागे घ्यावेत. राहुल गांधी बुधवारी काँग्रेसच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत की, शेतकरी भारताची शक्ती असून त्याला धमकावणे, दडपणे, मारणे हे सरकारे काम नाही. शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्यांचे समाधान करणे सरकारचे काम आहे. शेतकऱ्यांना खूप चांगल्या प्रकारे मी ओळखतो. ते मागे सरणार नाही, सरकारलाच माघार घावी लागेल. यातच सरकारचा फायदा असल्याचे, ते म्हणाले आहेत.
दरम्यान शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट करत पॉपस्टार रिहानाने एक बातमी शेअर केली आहे. या बातमीत शेतकरी आंदोलनामुळे इंटरनेट सुविधा बंद केल्याचा उल्लेख आहे. ही बातमी शेअर करत रिहानाने लिहिले आहे की, यासंदर्भात आपण चर्चा का करत नाही?