पाणी समजून सॅनिटायझर प्यायले मुंबई मनपाचे सहआयुक्त


मुंबई – पाणी समजून मुंबई महापालिकेचे सहआयुक्त रमेश पवार हे सॅनिटायझर प्यायलाचा प्रकार समोर आला आहे. आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला जात असून त्यावेळी हा प्रकार घडला. रमेश पवार यांनी शिक्षण बजेट मांडले जात असताना पाण्याची बाटली समजून सॅनिटायझरची बाटली उचलली आणि प्यायले. उपस्थितांनीही यावेळी सॅनिटाझर प्यायले असल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर ते काही वेळासाठी तिथून बाहेर पडले आणि नंतर पुन्हा येऊन कामकाजात सहभागी झाले.

दरम्यान यवतमाळमध्ये नुकताच असाच काहीसा प्रकार घडला आहे. चिमुकल्यांना पोलिओ लसीकरण मोहिमेदरम्यान पोलिओच्या लसीऐवजी चक्क सॅनिटायझर पाजण्यात आल्याची संतपाजनक घटना घाटंजी तालुक्यातील भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कापसी (कोपरी) येथे घडली आहे. १२ बालकांना सॅनिटायझर पाजल्यामुळे प्रकृती बिघडल्याने रविवारी रात्री यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यासह दोन आरोग्य कर्मचाऱ्यांना याप्रकरणी निलंबित करण्याचा प्रस्ताव चौकशी समितीने दिला आहे.