शेतकरी आंदोलनवर क्रिकेटच्या देवाचे भाष्य


मुंबई – प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानाने दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यापासून देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. या आंदोलनाला रिहानाच्या टि्वटनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन पाठिंबा मिळू लागला आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग पॉर्नस्टार मिया खलिफानेही भारत सरकारवर टीका केली.


दरम्यान या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी पाठिंबा दिला असला, तरी देशात सध्या यावरुन आता दोन गट पडल्याचे चित्र आहे. बॉलिवूडमधील काही कलाकारांनंतर आता क्रिकेटचा देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सुद्धा या विषयावर भाष्य केले आहे. देशाच्या सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही. बघ्याच्या भूमिकेत बाह्यशक्ती राहू शकतात पण त्यात ढवळाढवळ करु शकत नाहीत. भारतीयांना भारत माहित आहे. देश म्हणून आपण सर्व एकत्र राहूया, असे टि्वट सचिन तेंडुलकरने केले आहे. हे टि्वट करताना सचिन तेंडुलकरने #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda हे दोन हॅशटॅगही दिले आहेत.