ओटीटीवर रिलीज होणार आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’!


सिनेरसिक प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळीच्या गंगूबाई काठियावाडी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. आता ओटीटी प्लेटफॉर्मला या चित्रपटाचे डिजिटल राइट्स विकण्यात आल्याचे वृत्त आहे. नेटफ्लिक्सने चित्रपटाचे राइट्स विकत घेतले आहेत. पण, नेटफ्लिक्सने हे राइट्स विकत घेण्यासाठी मोठी रक्कम मोजल्याचे सांगितले जात आहे. 70 कोटी रूपये नेटफ्लिक्सने दिल्याची माहिती आहे. पण तशी घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

हुसेन जैदी यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकावर आधारित हा चित्रपट आहे. आलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सध्या चित्रपटाचे शूटिंग मुंबईत सुरू आहे. 22 डिसेंबर रोजी संजय लीला भन्साळी, आलिया भट्ट आणि हुसेन कैदी विरोधात गंगूबाईच्या कुटुंबियांनी गुन्हा दाखल केला होता. गंगूबाई काठियावाडी यांच्या कुटुंबियांनी चित्रपटाबद्दल काही आक्षेप घेतले होते.

आलिया व्यतिरिक्त गंगूबाई काठियावाडी चित्रपटात अजय देवगण पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे. तो चित्रपटात आलियाच्या गुरूची भूमिका साकारणार आहे. फाळणीच्या आधी आणि नंतरची कथा देखील या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. हुसेन जैदी यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकात असे सांगितले गेले आहे की, गंगुबाई हे 60 च्या दशकात मुंबई माफियाचे एक मोठे नाव होते. गंगुबाई ह्या तिच्या पतीकडून केवळ 500 रुपयांत विकली गेली होती. त्यानंतर ती वेश्या व्यवसायात गुंतली. यावेळी तिने अनेक मुलींच्या उन्नतीसाठी काम केले.