अंधेरी दंडाधिकारी कोर्टाने बजावले कंगना राणावतला समन्स


पाकव्याप्त काश्मीरशी मुंबईची तुलना करणारी अभिनेत्री कंगना राणावत ही आणखी गोत्यात येण्याचे चित्र सध्या दिसत आहे. कंगना विरोधात अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात गीतकार जावेद अख्तर यांनी मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला असून याप्रकरणी न्यायालयाने कंगनाला समन्स बजावले आहे. 1 मार्चला या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.

कंगनाने बॉलीवूडमध्ये माफिया राज असल्याचा आरोप केला होता, तसेच कंगनाने अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात गीतकार जावेद अख्तर यांचा उल्लेख रिपब्लिक चॅनलला दिलेल्या मुलाखतीत केला होता. याप्रकरणी कंगना विरोधात जावेद अख्तर यांनी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. याची दखल घेत न्यायालयाने कंगनाला समन्स बजावले व या प्रकरणाची सुनावणी 1 मार्चपर्यंत तहकूब केली.