ऑक्सफर्ड डिक्शनरीत दाखल झाला आत्मनिर्भरता शब्द


नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटातून सावरण्यासाठी संपूर्ण देशाला ‘आत्मनिर्भरता’ हा मंत्र दिला होता. आता ऑक्सफर्ड हिंदी शब्दकोषात आत्मनिर्भरता या शब्दाचा समावेश झाला. अनेकदा आत्मनिर्भरता या शब्दाचा पंतप्रधान मोदी तसेच कोट्यवधी भारतीयांनी वापर केला. भारतीयांशी संबंधित मनोरंजनाचे कार्यक्रम, माहितीपूर्ण कार्यक्रम, बातम्या अशा अनेक ठिकाणी आत्मनिर्भरता या शब्दाचा वापर वाढला.

आत्मनिर्भरता या शब्दाचा अल्पावधीत वापर प्रचंड मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. आत्मनिर्भरता हा शब्द लोकप्रिय झाला. आत्मनिर्भरता या शब्दाचा राजकारण, समाजकारण, अर्थकारण अशा वेगवेगळ्या क्षेत्रात वापर वारंवार होऊ लागला. भारतात वेगवेगळ्या भाषांतील कार्यक्रम, माहितीपट, बातम्या यात आत्मनिर्भरता या शब्दाचा वापर वारंवार सुरू झाला. एका शब्दाचा वापर इंग्रजी, हिंदी, मराठीसह अनेक भाषांमधून मोठ्या प्रमाणावर आणि अल्पावधीत होऊ लागल्यामुळे त्याची दखल ऑक्सफर्ड डिक्शनरीसाठी नव्या शब्दांवर संशोधन करणाऱ्या संपादकीय मंडळाने घेतली.

२०२० मध्ये लोकप्रिय झालेला आणि वापर वाढलेला एक हिंदी शब्द म्हणून ऑक्सफर्ड डिक्शनरीसाठी काम करणाऱ्या कृतिका अग्रवाल, पूनम निगम सहाय आणि इमोगन फॉक्सेल या भाषातज्ज्ञांनी आत्मनिर्भरता या शब्दाला मान्यता दिल्यामुळे ऑक्सफर्ड डिक्शनरीतील आत्मनिर्भरता या शब्दाच्या समावेशाचा मार्ग मोकळा झाला. आत्मनिर्भरता या शब्दाचा ऑक्सफर्ड हिंदी शब्दकोषात समावेश झाला.

कोरोना संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या भारताला सावरण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी आत्मनिर्भर भारत या नावाने आर्थिक पॅकेज देत असल्याचे जाहीर केले. देशाला अर्थव्यवस्था, समाज आणि वैयक्तिक पातळीवर सावरण्यासाठी आत्मनिर्भरता महत्त्वाची असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी देशाला समजावून सांगितले होते.