कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे मालक, व्यवसायाने भिकारी

beggar
भारतामध्ये प्रत्येक शहरामधील रहदारीच्या चौकाचौकात, मंदिरांच्या परिसरामध्ये भिकाऱ्यांची गर्दी आवर्जून आढळतेच. लोकांनी दिलेल्या दानाच्या जोरावर गुजराण करणारे हे याचक. पण आपण ज्याला पैसे दान म्हणून देत आहोत तो भिकारी वास्तविक कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचा मालक असल्याचे आपल्याला समजले, तर आपली प्रतिक्रिया काय असेल? भारतातील अनके शहरांमध्ये असे भिकारी आहेत, जे आजच्या तारखेला कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. यांची आयुष्य सर्व सुखसोयींनी संपन्न आहेत, यांची मुले मोठमोठ्या प्रतिष्ठित शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत, आणि तरीही भिक मागणे हा यांचा व्यवसाय आहे.
beggar1
मुंबईच्या परळ भागामध्ये दिवसाचे दहा तास भिक मागणाऱ्या ४९ वर्षीय भरत जैन उत्कृष्ट इंग्रजी बोलू शकतो. महिन्याला सत्तर ते ऐंशी हजार रुपये सहज कमाविणाऱ्या भरतच्या मालकीच्या मुंबईमध्ये दोन सदनिका असून, मुंबईतील उपनगरामध्ये दोन दुकानेही भरतच्या मालकीची आहेत. ही दोन्ही दुकाने भरतने इतरांना चालविण्यास दिली असून, त्यापासूनही त्याला चांगली मासिक मिळकत होत असते. बिहारमधील पटना शहरामध्ये भिक मागणाऱ्या पप्पू कुमार याचा बँक बॅलन्स लाखोंच्या घरात आहे. पप्पू अपंग असल्याने त्याच्या शारीरिक अपंगत्वावर दया येऊन लोक त्याला पैशाची मदत करीत असतात. पप्पू कुमारचा परिवार पटना येथे स्थायिक असून, त्याचा मुलगा प्रतिष्ठित इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहे.
beggar2
मुंबईच्या उच्चभ्रू उपनगरात भिक मागणारा कृष्ण कुमार दिवसाचे आठ ते दहा तास भिक मागून दिवसाला पंधरा हजार रुपयांची कमाई अगदी सहज करतो. आपल्या वन बेडरूम सदनिकेमध्ये कृष्ण कुमार आपल्या भावासोबत राहतो. धनवान भिकाऱ्यांच्या यादीमध्ये महिलाही मागे नाहीत. सर्वितीया देवी पटनाच्या रहिवासी आहेत. त्यांचे स्वतःच्या मालकीचे घर असून, इतर संपत्तीही भरपूर आहे. भिक मागून कमाविलेल्या पैशांमधून यांनी आपल्या मुलीचे थाटामाटात लग्न करून दिले असून, त्यांना भारतातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांची यात्रा केली आहे. त्याशिवाय सर्वितीया देवी परदेशवारी देखील करून आल्या आहेत.

Leave a Comment