कहाणी बहुमूल्य ‘तिमूर रुबी’ रत्नाची

ruby
१८४९ साली तत्कलीन पंजाब प्रांतावर ब्रिटीशांनी ताबा मिळविल्यानंतर त्यांनी अजिबात विलंब न करता लाहोरच्या ट्रेझरीकडे मोर्चा वळविला. इंग्लंडला परतताना ब्रिटिशांनी अमूल्य आणि अतिशय तेजस्वी असा कोहिनूर हिरा आपल्यासोबत भारतातून नेलाच, पण त्याच्याच बरोबर लाहोरमधून त्यांच्या हाताला लागलेला ‘तिमूर रुबी’, म्हणजेच माणिक देखील आपल्या ताब्यात घेतला. तब्बल ३५३.५ कॅरट वजनाचे हे अतिशय तेजस्वी माणिक रत्न, प्राचीन काळातील समजले जात असून, हे रत्न मंगोल तानाशाह ‘तिमूर’ याच्या संग्रही असल्याचे म्हटले जाते. तिमूर १३९८ साली भारतामध्ये आला, आणि त्यांनतर मुघल वंश येथेच वाढला. यांच्या संग्रही असलेले ‘तिमूर’ माणिक कोहिनूर पेक्षा किती तरी मौल्यवान असल्याचे म्हटले जाते. त्याकाळी अस्तित्वात असलेल्या मौल्यावान माणिक रत्नांमध्ये तिमूर माणिक जगामध्ये सर्वात मोठे असल्याचे इतिहासकार सांगतात. आजच्या काळामध्ये हे रत्न ब्रिटनची राणी एलिझाबेथ हिच्या खासगी संग्रहाचा भाग आहे. अश्या या अमूल्य रत्नाचा इतिहास मोठा रोचक आहे.
ruby1
या रत्नाला माणिक म्हटले जात असले, तरी हे रत्न माणिक नसून वास्तविक ‘स्पिनेल’ नामक रत्न असल्याचा शोध १८५१ साली लागला. माणिक आणि स्पिनेल ही दोन्ही रत्ने दिसावयास एक सारखी असून, त्यांचे रासायनिक कॉम्पोझिशन देखील एकसारखेच असते. पण या दोन्ही रत्नांतील मुख्य फरक हा, की माणिक रत्नावर प्रकाशाचा झोत मारला असता, हा प्रकाशाचा झोत दुभंगतो. स्पिनेलमधून जाणारा प्रखाशझोत मात्र एकसंध राहतो. त्यामुळे तिमूर रुबी नामक हे रत्न माणिक म्हणून ओळखले जात असले, तरी हे वास्तविक स्पिनेल नामक रत्न आहे.
ruby2
१३९८ च्या सुमारास जेव्हा मोंगोल तानाशाह तिमूर याने भारतामध्ये प्रवेश केला, तेव्हा तो वास्तव्याला दिल्ली येथे आला. दिल्लीतील हौज खास या भागामध्ये त्याने आपला तळ ठोकला. त्यांनतर तब्बल तीन दिवस तिमुराच्या सैन्याने आसपासच्या प्रांतांमध्ये अक्षरशः हैदोस घालीत प्रचंड लुटी केल्या. या लुटीमध्ये हे रत्न तिमुरच्या ताब्यात आले. त्यानंतर सुमारे सतराव्या शतकापर्यंत हे रत्न तिमुरच्या वंशजांच्या ताब्यात राहिले, आणि त्यांनतर हे रत्न शाह अब्बास नामक पर्शियन सुलतानाच्या ताब्यात गेले. पर्शियन सुलतान आणि तत्कलीन मुघल सम्राट जहांगीर यांचे संबंध मैत्रीपूर्ण असल्याने शाह अब्बासने तिमूर रुबी जहांगीरला भेट म्हणून दिला. हे रत्न जहान्गीराकडून अकबराकडे आणि त्याच्याकडून शाहजहान कडे आले. त्याने हे रत्न ‘मयूरसिंहासना’मध्ये जडविले.
ruby3
१७३९ साली पर्शियन सुलतान मोहम्मद शाह ‘रंगीला’ याच्या अधिपत्याखाली नादिर शाहने पुन्हा भारतामध्ये घुसखोरी करीत मुघल संपत्तीची लूट करून अनेक मौल्यवान रत्ने, आणि इतर संपत्ती आपल्यासोबत पर्शियाला नेली. त्यामध्ये शाहजहांच्या मौल्यवान, रत्नजडीत ‘मयूर सिंहासना’चा ही समावेश होता. या सिंहासनामध्ये जडविलेल्या तिमूर रुबीचे नामकरण नादिर शाह याने ‘ऐन-अल-हूर’ असे केले. नादिर शाह च्या मृत्यूनंतर हे रत्न अहमद शाह अब्दालीच्या ताब्यात आले. त्याच्याकडून त्याचा नातू शाह शुजा याच्याकडे हे रत्न येऊन तो रत्न मनगटावर धारण करीत असे. १८०९ साली शाह शुजाने आपल्या राज्यातून पलायन केले आणि तो भारतामध्ये, पंजाबचे महाराजे रणजीत सिंह यांच्या आश्रयाला आला. १८१३ साली महाराजा रणजीत सिंह यांनी कोहिनूर आणि तिमूर रुबी ही दोन्ही रत्ने आपल्या ताब्यात घेतली. महाराजा रणजीत सिंहांच्या मृत्यूनंतर ब्रिटीशांनी पंजाब प्रांत आपल्या ताब्यात घेतला आणि त्यानंतर राज्याची संपत्तीही ताब्यात घेतली. अश्या रीतीने कोहिनूर आणि तिमूर रुबी ही मौल्यवान रत्ने ब्रिटीशांच्या ताब्यात गेली आणि आजतागायत शाही रत्नसंग्रहाचा भाग बनून राहिली आहेत.

Leave a Comment