केंद्राची मोठी घोषणा, 100 टक्के क्षमतेने सुरु होणार देशभरातील चित्रपटगृह


मुंबई : चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेसह उघडण्याची परवानगी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिली आहे. यानुसार आता देशाभरातील सर्वच चित्रपटगृहे 1 फेब्रुवारीपासून 100 टक्के क्षमतेसह सुरू होतील. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटगृह 50 टक्के क्षमतेसह उघडण्याची परवानगी दिली होती. याचा फटका चित्रपटांना बसताना दिसत असल्यामुळे आपले चित्रपट अनेकांनी ओटीटीवर प्रदर्शित केले होते.

चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेसह उघडण्याची परवानगी मात्र, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिली असली तरी देखील चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेसह उघडण्यासाठी बऱ्याच नियम आणि अटी घालून दिल्या आहेत. याचे पालन चित्रपटगृह व्यवस्थापनाला करावे लागणार आहे.

1. चित्रपटगृहामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये कमीतकमी 6 फूट अंतर राखणे बंधनकारक असेल.

2. चित्रपटगृहांमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या तोडाला मास्क बंधनकारक आहे.

3. चित्रपटगृहांमध्ये प्रवेश करताना आणि बाहेर पडताना दोन्ही ठिकाणी सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक आहे.

4. चित्रपटगृहांच्या परिसरात थुंकण्यास कडक निषिद्ध