ही आहे भारतातील सर्वात चिमुकली प्रवासी ट्रेन

ernakulam
भारतीय रेल्वे प्रवासी सुविधेसाठी दररोज शेकडो ट्रेन चालविते त्यातील अनेक दीर्घ पल्ल्याच्या तर अनेक कमी अंतराच्या आहेत. काही सुपर फास्ट वेगाने धावतात तर काही डूगुडूगु धावणाऱ्या आहेत. मात्र या बहुतेक सर्व गाड्यांना किमान डझनभर डबे तरी असतात. देशातली सर्वात चिमुकली आणि सर्वात संथ गतीने जाणारी ट्रेन कोचीन हार्बर टर्मिनस ते एर्नाकुलम जंक्शन या दरम्यान नुकतीच सुरु झाली आहे.

या ट्रेनला अवघे तीन डबे आहेत आणि त्यातून ३०० प्रवासी प्रवास करू शकतात. ही ट्रेन अवघे ९ किमी अंतर कापते आणि त्यातही तिला एक स्टॉप आहे. या गाडीचा वेग इतका हळू आहे कि सायकल वरून जाणारा माणूसही तिला सहज मागे टाकू शकतो. ९ किमीचे अंतर कापायला हि ट्रेन ४० मिनिटे लावते. सध्या या गाडीतून दररोज साधारण १० ते १२ प्रवासी प्रवास करतात.

Leave a Comment