उदमांजराच्या विष्ठेतील बियांपासून तयार होते जगातील महागडी कॉफी

coffee
कंटाळवाण्या मूडला कॉफीचा एक घोट लगेच तरतरी आणतो. कॉफीची निर्मिती आणि निर्यात करणारा भारत हा आशिया खंडातला तिसरा मोठा देश असल्याचे अनेकांना माहितीही असेल. कॉफी हे पेय पिणारा जगभरात वर्ग खूप मोठा आहे आणि कॉफी तयार करण्याची जगाच्या पाठीवर प्रत्येक देशात त्यांची अशी खास पद्धत आहे.

civet cat coffee ही सर्वात महागडी कॉफी समजली जाते. उदमांजरच्या (civet cat) विष्ठेतील कॉफीच्या बियांपासून ही कॉफी तयार केली जाते. कॉफीची फळे उदमांजर खातात. ती फळांचा गर सहज पचवते पण बिया मात्र उदमांजरांना पचवता येत नाही. बिया तिच्या विष्ठेमार्फत बाहेर फेकल्या जातात. उदमांजर कॉफीची तिच फळे खाते जी चांगली आणि पिकलेली असतात, अशीही धारणा आहे.

कॉफीच्या बियांची चव वाढवण्यास मांजरीच्या पोटात असलेल्या द्रव्यामुळे मदत होते. तिची विष्ठा गोळा केल्यानंतर त्यातून बिया वेगळ्या केल्या जातात आणि त्यानंतर त्यापासून कॉफी तयार केली जाते. ही विष्ठा शोधणेही वेळखाऊ आणि कठीण काम असल्यामुळे ही कॉफी तयार करण्याच्या प्रक्रियेत जी लोक गुंतले आहेत त्यांची मजुरीही अधिक आहे. या सगळ्या कारणामुळे civet cat coffee सगळ्यात महागडी कॉफी समजली जाते. अशाच प्रकारे महागडी कॉफी इंडोनेशियामध्येही तयार केली जाते तिला Kopi Luwak म्हणूनही ओळखले जाते.

Leave a Comment