आता जीवघेणा ठरत चालला आहे मोबाईल फोनचा जास्तीचा वापर

mobile
मुंबई : काही मिनिट स्मार्टफोन हातात नसेल तर आपल्यापैकी काहीजण सैरभैर होतात. पण आता जास्त वेळ फोन वापरणे धोकादायक बनत चालले आहे. आपल्याला फोन वापरताना हे जाणवत नसेल, पण आता हा जास्तीचा वापर जीवघेणा ठरत चालला आहे.

शरीराचे स्मार्टफोनच्या अतिवापराने मोठे नुकसान होते. त्याचा परिणाम डोळ्यांवर होतो, रात्रभर झोप न येणे, गॅजेट अॅडिक्शन अशा त्रासांना सामोरे जावे लागते. आता असे म्हटले जात आहे, की सलग अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ तुम्ही फोन कानाला लावून बोलल्यास तुम्हाला दहा वर्षांनी ब्रेन ट्यूमर होण्याची शक्यता दुप्पटीने वाढते.

एका अभ्यासाच्या आधारावर हा दावा आयआयटी मुंबईचे प्राध्यापक गिरीश कुमार यांनी केला आहे. देशातील अनेक ईएनटी (कान, नाक, घसा) स्पेशालिस्टसोबत बातचीत केल्यानंतर एक अहवाल प्रकाशित केला असल्याचे गिरीश कुमार यांचे म्हणणे आहे. या संशोधनामध्ये बहिरेपणा आणि ब्रेन ट्यूमरच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. जास्त वेळ फोनवर बोलल्यामुळे कान गरम होतात, असे सर्वेक्षणातील अनेकांनी मान्य केले आहे.

मायक्रोवेव्ह रिडेएशन्स सलग २० ते ३० मिनिट फोनवर बोलल्यानंतर शरीरात प्रवेश करतात, ज्यामुळे कानाच्या पाळीचे रक्त गरम होते. एक डिग्री सेल्सियसची रक्ताच्या तापमानात वाढ होते. अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ फोनवर बोलल्यानंतर डोकेदुखीची समस्या सुरु होते. त्यानंतर ब्रेन ट्यूमरच्या अंतिम टप्प्याचे लक्षणे दिसून येतात, असे संशोधनात म्हटले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment