इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा साकारणार कंगना राणावत


देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या चरित्र चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत मुख्य भूमिका साकारणार आहे. याबाबतची माहिती कंगणाने ट्विट करत दिली आहे. कंगनाचा ‘थलाइवी’नंतर हा दुसरा राजकीय चित्रपट असणार आहे. इंदिरा गांधी यांच्यावर आधारित चित्रपटाचे नाव अद्याप जाहिर करण्यात आलेले नाही.

ट्विट करत कंगनानं म्हटले आहे की, माझ्यासाठी इंदिराजी एक आयकॉनिक महिला आहेत. त्यांच्या आयुष्यावर बेतलेल्या चित्रपटात काम करण्यासाठी मी तयार असून मी त्यासाठी फोटोशूटही केले आहे. ज्यावेळी बॉलीवूडमध्ये काम करायला मी सुरुवात केली होती, तेव्हा मला वाटले नव्हते की मी कधी इंदिरा गांधींची भूमिका साकारेन. कंगनाच्या या ट्विटला मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी प्रतिसाद दिला आहे.


कंगना देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पण हा चित्रपट इंदिरा गांधी यांचा बायोपिक नसेल असे सांगण्यात येत आहे. या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकर भूमिका साकारणार असल्याचेही कंगनाने म्हटले आहे. एका पुस्तकावर आधारित हा चित्रपट असणार आहे. इंदिरा गांधी यांच्या काळातील आणीबाणी आणि ऑपरेशन ब्लूस्टार या दोन मोठ्या निर्णयही या चित्रपटात दाखवले जाणार आहेत. या चित्रपटाचे कथानक साई कबीर यांनी लिहिले आहे. शिवाय याचे दिग्दर्शनही साई कबीरचे करणार आहेत.