सुंदर, चमकदार चेहऱ्यासाठी आजमावा साबुदाण्याचा फेस मास्क

facepack
सुंदर, नितळ त्वचा, आणि त्यामुळे सुंदर दिसणारा चेहरा कोणाला नको असतो? त्वचा नितळ आणि मुलायम असावी या करिता अनेक सौंदर्यप्रसाधनांचा वापर आपण करीत असतो. त्याचबरोबर सातत्याने नवनवीन येणाऱ्या ब्युटी ट्रीटमेंटस् देखील आजमावून पहात असतो. पण या ट्रीटमेंटस् किंवा सौंदर्य प्रसाधानांमध्ये वापरली जाणारी तत्वे, रसायने त्वचेला सुंदर बनविण्याऐवजी हानिकारक देखील ठरण्याची शक्यता असते. त्यामुळे त्वचेच्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी शक्यतो नैसर्गिक पदार्थ वापरणे योग्य ठरते.
facepack1
चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी साबुदाण्यापासून बनविलेला फेस मास्क अतिशय उपयोगी ठरतो. आपल्या त्वचेच्या प्रकृतीप्रमाणे हा फेस पॅक तयार करायचा आहे. ज्याची त्वचा रुक्ष, कोरडी असले, त्यांनी साबुदाणा कोरडा दळून घेऊन त्यामध्ये दुधावरील साय घालून फेस मास्क तयार करावा. हा मास्क चेहऱ्यावर लाऊन तो वाळेपर्यंत चेहऱ्यावर राहू द्यावा, त्यानंतर थंड पाण्याने हा मास्क धुवून टाकावा. या मास्कमुळे त्वचेचा कोरडेपणा नाहीसा होऊन त्वचा मुलायम बनते आणि आर्द्र राहते. हा पॅक आठवड्यातून दोनदा लावावा.
facepack2
ज्यांची त्वचा तेलकट असेल, त्यांनी साबुदाणा मिक्सरवर बारीक करून घेऊन त्यामध्ये लिंबाचा रस किंवा दही मिसळून हा पॅक चेहऱ्यावर लावावा. हा मास्कही वाळेपर्यंत चेहऱ्यावर ठेऊन नंतर थंड पाण्याने धुवून टाकायचा आहे. या पॅकमुळे त्वचा मुलायम होऊन त्वचेचा तेलकटपणा कमी करण्यास सहायक आहे. हा पॅक आठवड्यातून दोनदा लावावा.
facepack3
ज्यांच्या त्वचेवर मुरुमे, पुटकुळ्या, काळसर डाग असतील त्यांनी साबुदाणा मिक्सरवर बारीक करून घेऊन त्यामध्ये साधे पाणी मिसळून फेस पॅक तयार करावा आणि तो चेहऱ्यावर लावावा. या मास्कमध्ये पाण्याऐवजी गुलाबजलही वापरता येईल. याच्या नियमित वापराने चेहऱ्यावरील मुरुमे आणि काळसर डाग कमी होण्यास मदत होते. तसेच उन्हामुळे चेहऱ्यावर आलेला काळसरपणाही या मास्क मुळे कमी होतो.

Leave a Comment