आयुर्वेदानुसार मीठ निरनिराळ्या प्रकारचे, प्रत्येकाचे प्रभाव निराळे

salt
स्वयंपाकामधे वापरल्या जाणाऱ्या मसाले, किंवा इतर पदार्थांच्या बाबतीत आयुर्वेदामध्ये अनेक विवरणे देण्यात आली आहेत. आपण खातो त्या प्रत्येक वस्तूचा आपल्या शरीरावर प्रभाव पडत असतो. हे पदार्थ आणि त्यांचे आपल्या शरीरावर होणारे प्रभाव यांचे सविस्तर, शास्त्रशुद्ध वर्णन आयुर्वेदामध्ये केले गेले आहे. स्वयंपाकातील पदार्थांना चव येण्यासाठी मसाल्यांचा वापर अनिवार्य असतो. मसाल्यांच्या जोडीने पदार्थाला चव येण्यासाठी आवश्यक असते, ते मीठ. आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे मीठ निरनिराळ्या प्रकारचे असते. जसे मिठाचे प्रकार वेगवेगळे, तसे त्यांचे आपल्या शरीरावर पडणारे प्रभावही वेगवेगळे असतात.
salt1
मीठ समुद्रच्या पाण्यापासून बनविले जाते हे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. पण समुद्राच्या पाण्याने बनविल्या गेलेल्या मिठाशिवाय अन्य काही प्रकारच्या मिठाचा देखील वापर स्वयंपाकामध्ये होत असतो. समुद्री मिठाच्या शिवाय सैंधव या मिठाचा वापर स्वयंपाकामध्ये केला जातो. या मिठाला पहाडी मीठ असे ही म्हटले जाते. या मिठामुळे असलेल्या इतर तत्वांमुळे या मिठाचा रंग शुभ्र दिसत नाही. आणखी एक प्रकारचे मीठ म्हणजे काळे मीठ. हे देखील सर्रास वापरले जात असते. या मिठामध्ये लोह तत्वे आणि गंधक मिसळलेले असते.
salt2
सामान्यपणे मीठ कफ आणि पित्तवर्धक असून, वातरोधक असते. सैंधवाचा वापर उपवासाच्या पदार्थांमध्ये केला जातो. पचनशक्ती सुधारण्यासाठी आणि भूक वाढण्यासाठी हे मीठ उपयुक्त आहे. हे मीठ कफवर्धक नाही. समुद्री मिठामध्ये आयोडीन मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे ज्यांच्या आहारामधून शरीराला पुरेसे आयोडीन मिळत नाही, त्यांनी समुद्री मिठाचा वापर करावयास हवा. आयुर्वेदानुसार स्वयंपाकामध्ये समुद्री मीठ आणि सैंधव यांचा वापर आलटून पालटून करणे श्रेयस्कर मानले गेले आहे. काळ्या मिठाचा वापर कोशिंबिरी मध्ये किंवा सॅलडवर घालण्यासाठी केला जातो. हे मीठ पाचक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment