पोलिसांच्या हाती दिल्ली स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेज ; सुरु झाला ‘त्या’ दोन संशयितांचा शोध


नवी दिल्लीः काल (29 जानेवारीला) राजधानी दिल्लीच्या अब्दुल कलाम मार्गावरील इस्रायलच्या दूतावासाजवळ स्फोट झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. परिसरातील चार ते पाच गाड्यांचे या स्फोटात नुकसान झाले. विशेष म्हणजे दिल्ली स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेजही आता हाती लागले आहेत. पोलिसांना इस्राएलच्या दूतावासाबाहेरचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या स्पेशल सेलला सापडले असून, 2 व्यक्तींना टॅक्सी सोडत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट होत आहे.

त्या दोघा संशयितांचे स्केच आता सीसीटीव्ही फुटेज आणि ड्रायव्हरच्या साथीने तयार करण्यात येत आहेत. पोलिसांना घटनास्थळी बंद पाकीटही आढळले आहे, तसेच एक चिठ्ठीसुद्धा सापडलीय. त्या चिठ्ठीत इस्रायली भाषेतून इशारा देण्यात आला आहे, ये तो ट्रेलर है, असा चिठ्ठीत उल्लेख होता. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमकडून तपास सुरू आहे.