बहुतेक सर्व घरात जायफळ हा मसाल्यातील पदार्थ असतो. खिरी, श्रीखंड, बासुंदी सारख्या पक्वानांना आपल्या खास वासाने अधिक रुचकर बनविणारे जायफळ अनेक औषधी गुणांनी युक्त आहे. काय आहेत या जायफळाचे औषधी गुण त्याची हि माहिती माझा पेपर वाचकांसाठी
अल्पमोली, बहुगुणी औषधी, जायफळ
जायफळ हे झाडाचे बी आहे. जायफळाच्या ८० विविध जाती आहेत आणि ते मुख्यत्वे भारत, ऑस्ट्रेलिया आणि प्रशांत महासागरातील बेटांवर आढळते. १ ते दीड इंचाचे हे फळ पिकले कि दोन भागात फुटते. तपकिरी रंगाच्या कवच्यावर केशरी रंगाचे धागे असतात त्याला जायपत्री म्हणतात तर तपकिरी कवचाच्या आत जे फळ असते ते जायफळ होय.
जुलाब किंवा अतिसार होत असेल तर जायफळ उगाळून त्याचे चाटण घ्यावे किंवा पाण्यात चूर्ण उकळून ते पाणी प्यावे यामुळे त्वरित आराम पडतो तसेच पोटातील वायू कमी होण्यास मदत होते. पोत्दुखीत ४ ते ५ थेंब जायफळ तेल साखरेसोबत चाटल्यास आराम मिळतो. पचनशक्ती सुधारते. चेहऱ्यावर मुरमे, पुटकुल्या येत असतील व त्याचे डाग पडले असतील तर जायफळ दुधात उगाळून लेप द्यावा आणि जरा वेळाने पाण्याने धुवून टाकावे. डाग कमी होतात.
डोकेदुखीत जायफळ पाण्यात उगाळून चाटण घेतल्यास डोकेदुखी कमी होते भूक लागत नसेल तरी जायफळाची चिमुटभर पूड चोखाल्याने भूक सुधारते. लकवा भरल्यास त्या अवयवावर जायफळ पाण्यात उगाळून लेप दिल्यास लकवा कमी होतो तसेच बाळंतपणानंतर कंबर दुखत असेल तर कमरेवर लेप लावल्याने आराम मिळतो. जायफळ हृदयाला बळकटी देणारे आहे तसेच डोळ्यांसाठी चांगले आहे. जायफळ उगाळून अगदी अल्प प्रमाणात काजळासारखे डोळ्यात घातले तर डोळ्याची खाज कमी होते. दातदुखी असेल तर जायफळ तेलाचा बोळा दातात धरावा. घश्याला सूज असले तर जायफळ पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. घसादुखी कमी होते. जायफळ आवाजात गोडवा आणते.
सर्दी पडसे झाल्यास तसेच थंडीच्या दिवसात जायफळाचा छोटा तुकडा तोंडात ठरावा. दर दोन दिवसांनी हा उपाय केल्यास शरीरातील उष्णता कायम राखली जाते. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, डोळ्याखाली आलेली काळी वर्तुळे जायफळ उगाळून त्याचा लेप चेहऱ्यावर दिल्यास कमी होतात. हा उपाय आठवड्यातून दोन वेळा करावा.
—————–