काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्यासह सहा पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल


नवी दिल्ली – काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्यासह आणखी 6 पत्रकारांविरोधात प्रजासत्ताक दिनी उत्तर प्रदेशातील गौतमनगर येथे घडलेल्या हिंसाचाराप्रकरणी उत्तर प्रदेश पोलीसांनी गुन्हा दाखल केली आहे. वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई, मृणाल पांडेय, जफर आगा, परेशनाथ, अनंत नाथ व विनोद जोस यांचा त्यात समावेश आहे.

देशद्रोह व शांती भंग करण्याचा गुन्हा या सगळ्या व्यक्तींवर दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात हिंसा पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. समाजात सोशल मीडियावरील पोस्टमुळे तेढ निर्माण करण्यात आल्याचे एफआयआरमध्ये नोंदवण्यात आले आहे. दिल्लीत प्रजासत्ताक दिनी मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. दिल्ली पोलीसांची क्राईम ब्रॅन्च त्याचा आता तपास करत आहे.