राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर फडणवीस म्हणतात…


राळेगणसिद्धी – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाणार असून राज ठाकरे १ मार्च ते ९ मार्चच्या दरम्यान एखाद्या दिवशी अयोध्या दौरा करणार असून रामलल्लांचे ते दर्शन घेणार आहेत. यासंदर्भातील निर्णय आज मुंबईमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये घेण्यात आल्याची माहिती पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना याचसंदर्भात विचारण्यात आले असता, त्यांनी मी सुद्धा अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे म्हटले आहे.

फडणवीस यांना पत्रकारांनी राज ठाकरे यांच्या या दौऱ्याबाबत विचारले असता त्यांनी, अयोध्या दौऱ्यावर मी सुद्धा जाणार असल्याचे म्हटले आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे हे अहमदनगरमध्ये कृषी विधेयकाविरोधात उपोषण करण्याच्या तयारीत आहे. फडणवीस आज राळेगणसिद्धीला अण्णांच्या मनधरणीसाठी गेले आहेत. यावेळी राज यांच्या दौऱ्यासंदर्भात प्रश्न त्यांना विचारला असता राज ठाकरे यांचा अयोध्येला जाण्याचा निर्णय चांगला आहे. सगळ्यांनीच अयोध्येला गेले पाहिजे, मी देखील जाणार असल्याचे ते म्हणाले.