चिंताजनक! बिल गेट्स यांनी पुन्हा एकदा दिली जैविक हत्यारांबाबत धोक्याची सुचना


नवी दिल्ली – कोरोनाचे संकट संपूर्ण जगावर ओढावल्यानंतर अशी अफवा पसरवली होती की, चीनने एक असे हत्यार बनवले आहे. ज्याच्या वापरामुळे संपूर्ण जग नष्ट करता येऊ शकते. कोरोनाला आतापर्यंत एका महामारीच्या रुपात पाहिले जात आहे. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी आता पुन्हा एकदा जैविक हत्यारांबाबत धोक्याची सुचना दिली आहे. भविष्यातील महामारी हा जैविक शस्त्राचा परिणाम असू शकतो. जगाने यासाठी तयार असले पाहिजे. अशी धोक्याची सुचना गेट्स यांनी दिली आहे.

आपल्या एका ब्लॉगमध्ये बिल गेट्सने लिहिले आहे की, कोरोना हा अंतिम साथीचा रोग ठरू शकत नाही. आपण युद्धाची धमकी ज्याप्रकारे गांभीर्याने घेतो, तसे महामारीसारख्या रोगाशी आपण लढायला आणि गंभीरपणे विचार करण्यास तयार असले पाहिजे. जगाला संशोधन आणि विकासासाठी दुप्पट गुंतवणूक करण्याची गरज आहे. त्याचबरोबर त्यांनी पुढे लिहिले की, आम्हाला पुढील महामारीसाठी दरवर्षी कोट्यवधी डॉलर्स खर्च करावे लागतील, तरी कोरोनावर खर्च झालेली किंमत २ ट्रिलियन डॉलर आहे. कोट्यावधी रुपये जगाला खर्च करावे लागतील जेणेकरुन कोट्यावधी लोकांना मरण्यापासून रोखता येईल.

दरम्यान अलिकडेच बिल गेट्सने यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्विटद्वारे दिली होती. ही लस दिल्याबद्दल त्यांनी जगातील सर्व वैज्ञानिक, चाचण्यांमध्ये सहभागी असणारे स्वयंसेवक, फ्रंटलाईन कामगारांचे आभार मानले आहेत. बिल गेट्स यांच्याद्दल कोरोनाकाळात अनेक अफवा ऐकायला मिळाल्या आहेत. एका अहवालात बिल गेट्स यांच्यावर आरोप करण्यात आला होता की ते औषधनिर्माण कंपन्यांशी जोडलेले आहे.

दुसर्‍या अहवालात असे म्हटले होते की बिल गेट्स कोरोना लसीद्वारे लोकांच्या शरीरात मायक्रोचिप घालू इच्छित आहेत. जेणेकरून व्हायरसच्या स्थितीविषयी अधिक माहिती मिळेल, तथापि नंतर ही माहिती खोटी, अफवा असल्याचे गेट्स यांनी म्हटले आहे.