छातीत दुखू लागल्याने सौरव गांगुली पुन्हा रुग्णालयात दाखल


कोलकाता – पुन्हा एकदा बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची तब्येत बिघडली असून त्यांना रात्रीपासून अस्वस्थ वाटत होते. दरम्यान त्यांच्या छातीत बुधवारी दुपारी थोडे दुखू लागले. प्रकृती बिघडल्याने कोलकातामधील एका खासगी रुग्णालयात गांगुली यांना दाखल करण्यात आले आहे.

२ जानेवारीला सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिममध्ये व्यायाम करत असतानाच त्यांच्या डोळ्यापुढे अंधारी आली होती. त्यानंतर गांगुली यांना दक्षिण कोलकाता येथील वूडलँड या एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. ७ जानेवारीला उपचारानंतर गांगुली यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. प्रकृतीमध्ये वेगाने सुधारणा होत असल्याने त्यांच्यावर होणारी अ‍ॅन्जिओप्लास्टी पुढे ढकलण्यात आली होती.