
मुंबई :- गोवा राज्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे आहे व २५ जानेवारी रोजी ते गोवा विधानसभेच्या प्रथम सत्राला संबोधित करणार असल्यामुळे त्यादिवशी राज्यपाल शेतकरी शिष्टमंडळास भेटू शकणार नसल्याचे राजभवनातून अगोदरच स्पष्ट करण्यात आल्याचे स्पष्टीकरण राजभवनकडून देण्यात आले आहे.
शेतकरी मोर्चाला दिली होती राज्यपालांच्या दौऱ्याची पूर्वकल्पना – राजभवनाचे स्पष्टीकरण
संयुक्त शेतकरी मोर्चाचे धनंजय शिंदे यांना २२ जानेवारी रोजी दूरध्वनीद्वारे तसेच निमंत्रक श्री प्रकाश रेड्डी यांना २४ जानेवारी रोजी लेखी पत्राद्वारे राज्यपालांच्या अनुपलब्धतेबद्दल कळविण्यात आले होते. शिंदे यांनी व्हॉट्सॲप संदेशाद्वारे निरोप मिळाल्याचे मान्य केले होते. तसेच प्रकाश रेड्डी यांना याबाबतचे लेखी पत्र २४ जानेवारी रोजी प्राप्त झाले होते. त्यामुळे राज्यपालांनी शिष्टमंडळाला भेटीची वेळ देऊन भेट दिली नाही हे वृत्त चुकीचे असल्याचे राजभवनातून स्पष्ट करण्यात येत आहे.
https://mahasamvad.in/wp-content/uploads/2021/01/rajbhavan-letter.jpg
राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार शिष्टमंडळाकडून २५ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता निवेदन स्वीकारतील असे देखील धनंजय शिंदे यांना पूर्वीच कळविण्यात आले होते व तसे स्वीकृत असल्याबद्दल त्यांनी संदेशाद्वारे कळविले होते.
