आपल्या युजर्सचा चॅटिंग अनुभव आणखी चांगला करण्यासाठी व्हॉट्सअॅप नवीन नवीन फीचर सादर करत आहे. त्यानुसार आता या यादीत स्टिकर शॉर्टकट Sticker Shortcut नावाचे एक फीचर येण्याच्या तयारीत आहे. हे फीचर व्हॉट्सअॅपमध्ये लवकरच ग्लोबल युजर्संसाठी रोलआउट केले जाऊ शकते.
व्हॉट्सअॅपच्या ‘या’ नव्या जबरदस्त फीचरमुळे वाढणार आणखी चॅटिंगची मजा
व्हॉट्सअॅपमधील स्टिकर शॉर्टकट फीचरची माहिती WABetaInfo ने दिली असून रिपोर्टच्या माहितीनुसार, चॅट बारमध्ये हे फीचर पाहायला मिळू शकते. रोलआउट झाल्यानंतर युजर्सला चॅट बारमध्ये इमोजी एन्टर करण्यासाठी किंवा कोणताही शब्द लिहिल्यावर वेगळ्या रंगात वेगवेगळे आयकॉन दिसतील. तर कीबोर्डला एक्सपान्ड करण्यावर व्हॉट्सअॅपचे सर्व स्टीकर पाहता येतील.
WABetaInfo च्या माहितीनुसार, या फीचरला आता अँड्रॉयड डिव्हाइससाठी कंपनी तयार करीत आहे. या फीचरला व्हॉट्सअॅप बीटा युजर्ससाठी लवकरच रोलआउट केले जाऊ शकते. स्टिकर शॉर्टकट शिवाय कंपनीने अँड्रॉयड आणि आयओएस बेस्ड अॅप्ससाठी नवीन अॅनिमेटेड स्टिकर पॅकला रिलीज केले आहे. हे फीचर व्हॉट्सअॅप वेबसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. १.४ एमबी साइजच्या या स्टिकर पॅकचे नाव Sumikkogurashi आहे. जगभरात व्हॉट्सअॅप युजर या फीचरला व्हॉट्सअॅप स्टिकर स्टोर वरून डाउनलोड करु शकतात.