सिक्कीममध्ये चीनचा अतिक्रमणाचा डाव भारतीय सैन्याने लावला उधळून


सिक्कीम – चीनच्या सैनिकांनी पूर्व लडाख सीमेजवळ अतिक्रमण केलेले असतानाच आता चीनच्या सैनिकांनी सिक्कीमध्ये सुद्धा अतिक्रमणाचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. चीनचा अतिक्रमणाचा हा डाव सतर्क असलेल्या भारतीय सैन्याने उधळून लावला असल्याची ही माहिती इंडियाने टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

चीनच्या सैनिकांनी मागच्या आठवडयात भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना भारतीय सैनिकांनी आव्हान दिले. ही घटना उत्तर सिक्कीमच्या नाकु ला येथे घडली. भारताच्या जवानांनी पीएलएच्या सैनिकांना रोखल्यानंतर जोरदार हाणामारी झाली. २० चिनी सैनिक सिक्कीमच्या नाकुला येथे झालेल्या या घटनेमध्ये जखमी झाले आहेत.

भारताच्या बाजूला चार जवान जखमी झाले आहेत. अत्यंत प्रतिकुल वातावरण उत्तर सिक्कीमध्ये असतानाही, चीनचा घुसखोरीचा हा डाव भारतीय जवानांनी यशस्वी होऊ दिला नाही. पीएलएच्या सैनिकांना मागे ढकलले. चकमक झालेल्या ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती आहे.