आजपासून डाउनलोड करता येणार आधारप्रमाणे वोटर कार्डची पीडीएफ कॉपी


तुमचे मतदान ओळखपत्र जर हरवले असेल तर आता तुम्हाला त्याची डुप्लिकेट कॉपी मिळवण्यासाठी सरकारी कार्लालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. आजपासून केंद्रीय निवडणूक आयोग e-EPIC सुविधा सुरू करत आहे. तुम्ही याद्वारे घरबसल्या मतदार ओळखपत्राची पीडीएफ कॉपी डाउनलोड करु शकाल. डिजीटल मतदान ओळखपत्राची सुरूवात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त होत आहे.

ही सुविधा लाँच झाल्यानंतर कोणत्याही समस्येशिवाय तुम्ही मतदार ओळखपत्र तुमच्या मोबाइल फोन किंवा पर्सनल कंम्प्युटरवर डाउनलोड करु शकतात. त्याचबरोबर हे ई-वोटर आयडी कार्ड डिजिटल लॉकरमध्येही सुरक्षित ठेवता येईल, तसेच डिजिटल फॉर्मेटमध्ये प्रिंटही करता येईल. दोन टप्प्यात ही सेवा निवडणूक आयोग सुरू करणार आहे. केवळ नवीन मतदार, ज्यांनी वोटर आयडीसाठी अर्ज केला आहे आणि ज्यांचे मोबाइल नंबर आयोगाकडे रजिस्टर्ड आहेत, असे युजर आजपासून अर्थात २५ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत डिजिटल वोटर आयडी कार्ड डाउनलोड करु शकतात.

तर, सर्व मतदार 1 फेब्रुवारीपासून ( ज्यांचा मोबाइल नंबर आयोगाकडे रजिस्टर्ड आहे ) आपल्या वोटर आयडीसाठी डिजिटल कॉपी डाउनलोड करु शकतात. निवडणूक आयोगाकडे ज्यांचा मोबाइल नंबर नोंदणी केलेला नसेल त्यांना स्वतःबाबतचा सर्व तपशील पुन्हा पडताळावा लागेल आणि मोबाइल नंबर लिंक करावा लागेल. नंतरच वोटर आयडी डाउनलोड करता येईल.

डिजीटल वोटर कार्ड डाउनलोड करण्यासाठी :-
https://voterportal.eci.gov.in/ आणि https://nvsp.in/ हे दोन संकेतस्थळ डिजीटल वोटर कार्ड डाउनलोड करण्यासाठी आहेत. त्याचबरोबर https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen या लिंकवर अँड्रॉइड मोबाइल युजर आणि आयओएस युजर https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004 या लिंकवरही टॅप करु शकतात.