अनसर्टिफाइड अँड्रॉइड डिव्हाइसवर काम करणार नाही Google Duo


लवकरच ‘अनसर्टिफाइड अँड्रॉइड’ स्मार्टफोन्सवर Google Duo हे गुगल कंपनीचे व्हिडिओ कॉलिंग अ‍ॅप काम करणार नाही. कंपनीने यापूर्वी अनसर्टिफाइड अँड्रॉइड स्मार्टफोन्ससाठी आपली गुगल मेसेज सेवा बंद केल्यानंतर आता व्हिडिओ कॉलिंग सेवाही बंद करणार आहे.

यासंदर्भात 9to5Googleने दिलेल्या रिपोर्टनुसार, याबाबतची माहिती Google Duo या व्हिडिओ कॉलिंग अ‍ॅपच्या अपडेट कोडमध्ये देण्यात आली आहे. गुगल ड्यूओ ज्या युजर्सच्या डिव्हाइसवर काम करणार नाही, कंपनीकडून अशांना मेसेजद्वारे माहिती दिली जाईल. कंपनी या मेसेजमध्ये युजर्सना क्लिप्स आणि कॉल हिस्ट्री डाउनलोड करण्यास सांगेल, जेणेकरुन युजर्सकडेत्यांचा डेटा सुरक्षित राहिल. अपडेट कोडनुसार, 31 मार्च 2021 नंतर अनसर्टिफाइड फोनचे युजर्स गुगल ड्यूओचा डेटा डाउनलोड करु शकणार नाहीत.

अनसर्टिफाइड अँड्रॉइड डिव्हाइस म्हणजे जे स्मार्टफोन ज्यांची गुगल कधी टेस्ट घेत नाही. या फोन्समध्ये प्ले स्टोअर सर्व्हिसशिवाय प्री-इंस्टॉल्ड गूगल अ‍ॅपही मिळत नाहीत. ज्या कंपन्यांच्या स्मार्टफोन्सवर गुगल ड्यूओ सेवा बंद होणार आहे त्यामध्ये ह्युवाईचा समावेश आहे. तुमच्याकडे जर नोकिया, सॅमसंग, वनप्लस, ओप्पो किंवा व्हिवो या कंपन्यांचा स्मार्टफोन असेल तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही.