Twitter वर तीन वर्षांनी झाले ‘ब्लू टिक व्हेरिफिकेशन’चे पुनरागमन


आपल्या प्लॅटफॉर्मवरील व्हेरिफिकेशन प्रोग्राम लोकप्रिय माइक्रोब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरने पुन्हा सुरू केला असून ट्विटरवर २२ जानेवारीपासून पुन्हा एकदा पब्लिक व्हेरिफिकेशनला सुरूवात झाली आहे. कंपनीने २०१७ मध्ये व्हेरिफिकेशन प्रोग्राम बंद केला होता, आता पुन्हा एकदा तीन वर्षानंतर याला सुरूवात झाली आहे.

विशेष म्हणजे ब्लू-टिक ज्यांचे अकाउंट सक्रीय असेल त्यांनाच मिळेल. सुरूवातीला कंपनीकडून सहा प्रकारच्या युजर्सना ब्लू टिक मिळेल, अर्थात त्यांचे अकाउंट व्हेरिफिकेशन होईल. सरकार (राज्य किंवा केंद्र) कंपनी, ब्रँड्स, नॉन प्रॉफिट ऑर्गनायजेशन, पत्रकार आणि न्यूज संस्था, एंटरटेन्मेंट, स्पोर्ट्स, गेमिंग, अॅक्टिव्हिस्ट, ऑर्गनायझेशन आणि इतर प्रभावशाली व्यक्तींचा यामध्ये समावेश असेल. ज्यांचे फॉलोअर्स जास्त आहेत, त्या अकाउंट्सनाही ब्लू-टिक मिळू शकते.

तर, आता ब्लू-टिकसाठी अनेक व्हेरिफाईड अकाउंट्स जे पात्र नाही आहेत किंवा असे युजर जे यापूर्वी सरकारचा हिस्सा होते, पण आता सरकारसोबत संबंध नाही आहेत, त्यांचे ब्लू टिक व्हेरिफिकेशन काढून टाकण्यात येणार आहे. तसेच ज्यांचा मृत्यू झाला आहे, अशा व्यक्तींच्या अकाउंट्सचेही ब्लू टिक व्हेरिफिकेशन काढण्यात येईल. शिवाय वारंवार ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे किंवा वादग्रस्त आणि तेढ निर्माण होईल, असे ट्विट करणाऱ्यांच्या अकाउंटचेही ब्लू-टिक हटवले जाणार आहे. जर तुम्हालाही ब्ल्यु टीक ऑप्शन हवे असेल तर ट्विटरच्या वेबसाइट किंवा अॅपमध्ये अकाउंट सेटिंग्समध्ये जाऊन रिक्वेस्ट व्हेरिफिकेशन पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.