ही आहेत अतिशय दुर्गम ठिकाणी बनलेली काही घरे

house
आपले घरकुल उभारण्यासाठी जेव्हा लोक तयार घरे विकत घेतात, किंवा घर बनवितात, तेव्हा त्या ठिकाणाच्या आसपास असणाऱ्या सोयी, सुविधा यांचा आधी विचार केला जातो. जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता ही पहिली गरज असतेच, त्याशिवाय रुग्णालय, शाळा, महाविद्यालये, वाहतुकीची साधने, बाजारपेठ इत्यादी सर्व सोयी घराच्या आसपास आहेत किंवा नाहीत हे पाहणेही अगत्याचे आहेत. पण काही लोक असे ही आहेत ज्यांनी या सुविधांचा विचार न करता केवळ निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी अतिशय दुर्गम ठिकाणी घरे बांधली. ज्वालामुखी असो, की भयंकर खोल दरी, या लोकांनी येथेच घरे बनविणे आणि त्या घरांमध्ये राहणे पसंत केले. खरे तर या घरांपर्यंत पोहोचणे हेच एक मोठे दिव्य आहे, आणि म्हणूनच ही घरे आकर्षणाचे केंद्रही ठरली आहेत.
house1
चीनमधील बौद्ध भिक्षुंसाठी बनलेली हँगिंग मोनॅस्ट्री अतिशय अनोख्या पद्धतीने बनविली गेली आहे. या मोनॅस्ट्रीला भेट देण्यासाठी वेळेचे बंधन नाही. दिवसा, रात्री कधीही पर्यटक या ठिकाणाला भेट देऊ शकतात. ही इमारत डोंगराच्या कड्यावर बनली असून, ही इमारत डोंगरापासून अधांतरी लटकत असल्याप्रमाणे भासते. ही ऐतिहासिक इमारत १५०० वर्षांपूर्वी बनली असून, हा मठ चीनमधील शांक्सी प्रांतातील दातोंग शहराच्या जवळ बनला आहे. जमिनीपासून ही इमारत सुमारे ७५ मीटर्सच्या उंचीवर आहे.
house2
हवाई मध्ये बनेलेल्या कालापाना या शहरामध्ये बनलेले हे घर जिथे आहे, तिथे एके काळी ज्वालामुखीचा विस्फोट झाल्याने लाव्हा वाहत आला होता. लाव्हा पासून जे खांब बचाविले, त्याच खांबांच्या आधाराने हे घर बनलेले आहे. कालापानाच्या ज्या भागामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता, त्या ठिकाणी लोकांना जाण्यासाठी स्थानिक प्रशासनाने बंदी घातली होती. पण तरीही या भागामध्ये आजतागायत ३५ परिवार वसलेले आहेत. या घरांच्या खाली एके काळी लाव्हा वाहत असे.
house3
ग्रीस येथील मेटेरोआ मठ हा देखील एका प्रचंड आकाराच्या खडकावर बनलेला असून, या मठाच्या चहु बाजूंना खोल दऱ्या आहेत. तर इराण येथील कांदोवान हे शहर मुंग्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. याचे कारण येथे असणाऱ्या मोठमोठ्या खडकांना कोरून येथील रहिवाश्यांनी मुंग्यांच्या वारूळाप्रमाणे दिसणारी घरे बनविली आहेत. इंडोनेशिया येथे बनलेले कोरोवाई ट्री हाऊस हे एका प्रचंड झाडावर, जमिनीपासून पाच ते सात मीटरच्या उंचीवर बनलेले आहे. इंडोनेशियामध्ये स्थानिक जमातींमध्ये होत असणाऱ्या युद्धांपासून संरक्षण मिळावे या उद्देशाने हे घर इतक्या उंचीवर बनविले गेले. कधी जोराचे वादळ आले, तर या घराची अवस्था काय होत असेल याची कल्पना न केलेलीच बरी.

Leave a Comment