घरबसल्या अशाप्रकारे करू शकता पॅनकार्डवरील चुकीची माहिती अपडेट

pan-card
नवी दिल्ली – आर्थिक व्यवहारांसाठी पॅनकार्ड हे अत्यावश्यक दस्तावेज असून याचा वित्तीय कामांमध्ये जास्त प्रमाणात वापर केला जातो. पॅनकार्डचा वापर ओळखपत्र म्हणून करता येते. तुमची जन्मतारीख, वडिलांचे नाव यांचा पॅनकार्डमध्ये समावेश असतो. सध्या तुम्ही पॅनकार्ड बनवले असेल आणि त्यामध्ये एखादी गोष्ट चुकीची समाविष्ट झाली असेल तर आता घाबरून जाण्याचे काही कारण नाही. कारण आज आम्ही तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने त्यात कशा सुधारणा करता येतील याबाबत सांगणार आहोत.

तुम्हाला सर्वात आधी एनएसडीएल ऑनलाईन सर्वीस या संकेतस्थळावर जावे लागेल. त्यानंतर अॅप्लिकेशन टाईप या बॉक्समध्ये Changes or corrections in existing PAN Data/ Reprint of PAN card या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर बॉक्समध्ये सर्व माहितीचा उल्लेख करून ती माहिती जमा करा. त्यानंतर एक टोकन नंबर तयार होईल.

टोकन नंबर तयार झाल्यानंतर आधार नंबर, वडिलांचे नाव इत्यादी माहितीचा उल्लेख करा. संपूर्ण माहिती यामध्ये भरा. तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पॅनकार्ड असतील तर इतर डिलीट करा. एकापेक्षा जास्त पॅनकार्ड जवळ बाळगणे हा गुन्हा आहे. या पेजच्या शेवटी मल्टीपल पॅन सरेंडर करण्याचा पर्याय आहे. तुमच्याकडे एकाहून अधिक पॅन कार्ड नसतील तर तो पर्याय रिकामा ठेऊन पुढील पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. याठिकाणी तुम्ही तुमचे वय, पत्ता, ओळखपत्र इत्यादी माहिती अपलोड करा. नंतर डिक्लेरेशन फॉर्म भरा. तुमचा फोटो, सही अपलोड करा. सर्व माहिती भरुन झाल्यानंतर फॉर्मचा प्रीव्ह्यू जरुर पहा. तुम्ही भरलेली माहिती ही योग्य आहे ना याची खात्री करा. त्यानंतर शुल्क भरा.

तुमचा पत्ता जर भारतातील आहे तर तुम्हाला १०० रुपये एवढी प्रोसेसिंग फी लागेल. ज्यांचा पत्ता भारताच्या बाहेरील आहे त्या लोकांना १०२० रुपये एवढी फी लागेल. पैसे भरण्यासाठी डेबिट कार्ड, नेटबँकिंग आणि डीडी असे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. शुल्क भरल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर अॅक्नॉलेजमेंट येईल. ते डाऊनलोड केल्यानंतर त्याची प्रींट काढा. वैयक्तिक अर्जदारांना दोन फोटो लावावे लागतील. तसेच वैयक्तिक अटेस्टेड करावे लागेल. यावर तुमचे स्वत:ची सही अशी करा की ती जेणेकरून तुमचा अर्धा फोटो आणि अर्ध्या अॅक्नॉलेजमेंटवर येईल. आता याला एनएसडीएल ई-गो वर पाठवून द्या. अॅक्नॉलेजमेंट आणि इतर जरुरी कागदपत्रे एनएसडीएलजवळ जमा करा. १५ दिवसांच्या आधी ही माहिती पोहचणे गरजेचे आहे. तुमचा पॅनकार्ड दुरुस्तीचा फॉर्म काळजीपूर्वक भरा.

तुम्ही पॅनकार्डच्या डिटेल्स अपडेट करण्यासाठी ऑफलाईन देखील अर्ज करु शकता. यासाठी पॅन दुरुस्तीचा फॉर्म तुम्ही जवळच्या एनएसडीएल केंद्रात जमा करा. हा फॉर्म डाउनलोड केला जाऊ शकतो. फॉर्मची प्रींट काढून तो भरा. या प्रक्रियेसाठी तुम्हाला संबंधित मुल्यांकन अधिकाऱ्याला पत्र लिहावे लागेल.

Leave a Comment